Hiraman Khoskar: शांत बसा...; काँग्रेस आमदाराचा मुख्यमंत्र्यांबाबत मोठा गौप्यस्फोट; पण, मी आघाडीचा धर्म पाळला...

Nashik Lok Sabha Election 2024: शेवटच्या टप्प्यात महायुतीच्या नेत्यांनी अनेक प्रयोग केले. त्यात प्रतिस्पर्धी आघाडीच्या प्रमुख नेत्यांनाही प्रचारापासून अलिप्त राहण्यासाठी प्रयत्न झाल्याचे बोलले जाते.
Nashik Lok Sabha Election 2024
Nashik Lok Sabha Election 2024Sarkarnama

Hiraman Khoskar News, 26 May: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे गटामध्ये चुरशीची लढत झाली. या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी नाशिक मध्ये अक्षरशः तळ ठोकला होता.

महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजाभाऊ वाजे होते. त्यांच्या विरोधात महायुतीचे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे होते. या दोन्ही उमेदवारांमध्ये शेवटच्या टप्प्यात अतिशय चुरस दिसून आली. दोन्ही बाजूंनी मतांची आघाडी मिळावी यासाठी पदाधिकारी मोठी मेहनत घेत होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत निकाला विषयी मोठी उत्सुकता आहे.

या निवडणुकी संदर्भात इगतपुरी मतदार संघामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या माजी आमदार निर्मला गावित आणि काँग्रेसचे विद्यमान आमदार हिरामण खोसकर हे उमेदवार वाजे यांच्यासाठी प्रचारात आघाडीवर होते. त्यामुळे त्यांना रोखण्यासाठी प्रतिस्पर्धी पक्षाच्या अनेक नेत्यांनी प्रयत्न केल्याचे बोलले जाते. यामध्ये काही मंत्र्यांनी देखील त्यांना फोन केले असे आता पुढे येऊ लागले आहे. त्यामुळे नेमके काय झाले? याची कार्यकर्त्यांत मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे.

Nashik Lok Sabha Election 2024
Pune News: विद्यार्थिनीने थेट पोलिस ठाणेच गाठले! काँग्रेस पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल, पुणे विद्यापीठात..

या संदर्भात काँग्रेसचे आमदार खोसकर यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री तीन वेळा नाशिकला आले होते. यादरम्यान त्यांच्या वतीने आपणास फोन आला होता. मी महाविकास आघाडीचा प्रचार करू नये. शांत बसावे. किंवा महायुतीच्या उमेदवाराला मदत करावी, असा निरोप देण्यात आला होता. मात्र आपण अतिशय प्रामाणिकपणे महाविकास आघाडीचे उमेदवार वाजे यांचा प्रचार केला. निवडणुकीत अतिशय मनापासून आघाडी धर्म पाळला आहे. कोणाच्याही दबावाला बळी पडलो नाही असे त्यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार खोसकर यांचा सर्व पक्षांची संपर्क आहे. विविध नेत्यांमध्ये त्यांचा वावर असतो. त्यामुळे लोकसभा निवडणुकीदरम्यान ते कोणाचा प्रचार करणार याबाबत काही लोकांना शासन करता होती. त्या अनुषंगाने एका मंत्र्यांने देखील खोसकर यांना महायुतीच्या प्रचारात मदत करण्याची विनंती केल्याचे कळते.

यंदाची निवडणूक महायुतीला अतिशय चुरशीची होती. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात महायुतीच्या नेत्यांनी अनेक प्रयोग केले. त्यात प्रतिस्पर्धी आघाडीच्या प्रमुख नेत्यांनाही प्रचारापासून अलिप्त राहण्यासाठी प्रयत्न झाल्याचे बोलले जाते. खोसकर यांना थेट मुख्यमंत्र्यांच्या वतीनेच प्रचारापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com