Bhausaheb Wakchaure : मुख्यमंत्री शिंदे, डझनभर मंत्र्यांनी पैसा ओतला अन् कसून जोरही लावला; पण जिंकणार तर ठाकरेंचाच पठ्ठ्या

Shirdi Lok Sabha Election Result 2024 : शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी विजयाचा दावा केला आहे. मतमोजणीच्या काही तास अगोदर दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.
Uddhav Thackeray, Bhausaheb Wakchaure
Uddhav Thackeray, Bhausaheb WakchaureSarkarnama

Lok Sabha Election 2024 : शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेनाविरुद्ध शिवसेना, असा सामना झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसह डझनभर मंत्री उतरले होते. पैसा ओतला गेला. जिंकण्यासाठी समोरच्यांनी कसून जोरही लावला. पण जनतेने ठरवले असल्याचे ठाकरेंचा पट्ट्याच जिंकणार, असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिर्डीतील उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी व्यक्त केला. मतमोजणीच्या काही तासाअगोदर त्यांनी दिलेली ही प्रतिक्रिया शिर्डी मतदारसंघात चर्चेची ठरली आहे.

माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले, "उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेत प्रवेश करताच शिर्डीच्या जनतेने माझा विजय निश्चित केला होता. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह त्यांच्या नेत्यांनी कितीही जोर लावला असला किंवा आंबेडकरांच्या वंचितने कितीही रोखण्याचा प्रयत्न केला तरी, माझा विजय जनतेने निश्चित केला आहे, असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिर्डीचे उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी केला.

"मी आनंदी आहे. निकाल माझ्या बाजूने लागणार आहे. जनतेने ठरवले आहे. मतदानानंतर हजारो लोकांना भेटलो. त्यांनी सांगितले की, तुम्ही निवडून येणार आहे. कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी देखील सांगितले की साहेब, आपणच निवडून येणार आहे. माझा जन्म याच मातीमधला आहे. प्रशासकीय सेवा इथंच झाली आहे. याच जनतेने मला २००९ मध्ये खासदार केले होते. गाव तिथे विकास हा उपक्रमातून खासदार असताना प्रत्येक गावात पोहोचलो. त्यावेळी जी कामे केली, त्याची जनता आजही आठवण काढते आहे. पण गेल्या दहा वर्षात मतदारसंघ मागे गेला आहे. ते देखील जनतेने पाहिला आहे. त्यामुळे जनतेने आपला विजय निश्चित केला आहे", असे भाऊसाहेब वाकचौरे यांनी म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Uddhav Thackeray, Bhausaheb Wakchaure
Ahmednagar Lok Sabha Exit Poll : विखे-लंकेंचा महामुकाबला; मतमोजणीला 5 आयपीएस, 8 डीवायएसपी अन् 3 हजार काँस्टेबलचा पाहारा

भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले की, मी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करताच जनतेने माझा विजय निश्चित केला होता. आपला माणूस आपल्यासाठी निवडून द्यायचा, हे जनतेने ठरवलेले आहे. शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह डझनभर मंत्री तळ ठोकून होते. असे असताना जनता माझ्याबरोबर होती, असा दावा वाकचौरे यांनी केला.

'वंचित'चा काहीच परिणाम नाही

शिर्डी लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवार देण्यात आला. त्याचा माझ्या मतांवर काहीच परिणाम होणार नाही, असे वाकचौरे यांनी म्हटले. तसेच मतमोजणीच्या दिवशी उद्या सकाळी घराबाहेर पडताना भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दर्शन आणि प्रार्थना करून पडणार असल्याचेही वाकचौरे यांनी सांगितले.

Uddhav Thackeray, Bhausaheb Wakchaure
Ahmednagar Lok Sabha Exit Poll : विखेंची भिस्त आता विठुरायावरच! एक्झिट पोलनंतर आत्मविश्वास डळमळला?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com