Congress In Ahmednagar : काँग्रेसच्या डोळा नगर शहर मतदारसंघावर; महासंकल्प मेळाव्यातून दावा ठोकणार

Congress to hold general resolution tomorrow in Ahmednagar : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना ठाकरे पक्षापाठोपाठ काँग्रेस अ‍ॅक्टिव्ह मोडमध्ये आलीय. काँग्रेस उद्या महासंकल्प मेळाव्यातून नगर शहर विधानसभा मतदारसंघावर दावा अधिक मजबूत करण्याची शक्यता आहे.
Congress In Ahmednagar
Congress In AhmednagarSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : विधानसभा निवडणुकांमुळे महाविकास आघाडीतील नेत्यांची अहमदनगर जिल्ह्यात राजकीय रेलचेल वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापनदिन, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांचे दौऱ्यांनतर आता अहमदनगरमध्ये काँग्रेस अ‍ॅक्टिव्ह मोडमध्ये आली आहे.

काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थित उद्या गुरूवारी नगर शहरात महासंकल्प मेळावा होत असून, नगर शहर विधानसभा मतदारसंघावर दावा अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करणार असे राजकीय गणित काँग्रेसने या मेळाव्यातून आखल्याचे दिसते.

नगर जिल्ह्यातील दोन लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला यश मिळवून देण्यास काँग्रेसचा (Congress) मोठा वाटा राहिला आहे. त्यामुळे काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत जागांसाठी झुकते माप मिळेल, अशी अपेक्षा आहे. यातून नगर जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सर्व्हे सुरू केला आहे. पहिल्या टप्प्यात काँग्रेसने नगर जिल्ह्यातील 12 पैकी 7 जागांवर दावा सांगत आहे. या जागा महाविकास आघाडीने सन्मानाने सोडाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली. यातून नगर शहरात उद्या काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थित महासंकल्प मेळावा होत असल्याचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ आणि शहराध्यक्ष किरण काळे यांनी सांगितले.

Congress In Ahmednagar
Nilesh Lanke And Anil Rathod : शशिकला राठोडांची लंकेच्या उपोषणस्थळी एंट्री; कार्यकर्त्यांना आली अनिलभैय्यांची आठवण

गेल्या आठवड्यात मुंबईत काँग्रेसची प्रदेश कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत नगर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाध्यक्ष जयंत वाघ आणि शहराध्यक्ष किरण काळे यांनी सादरीकरण केले. राष्ट्रीय महासचिव खासदार वेणुगोपाल, राज्याचे प्रभारी रमेश चेन्नाथला यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते. संगमनेर, श्रीरामपूर, राहाता, कोपरगाव, अकोले, नगर शहर आणि श्रीगोंदा या सात विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसने दावा सांगितला. नगर जिल्ह्यासह राज्यात ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकांना समोरे जाण्याचा निर्धार या बैठकीत नगर जिल्ह्यातून जयंत वाघ आणि किरण काळे यांनी व्यक्त केला.

Congress In Ahmednagar
Mahayuti Political News : महायुतीत खटक्यावर खटके; भाजपच्या 'या' मंत्र्यांवर अजित पवार गटाच्या नेत्याचा गंभीर आरोप

लोकसभा निवडणुकीला नगर जिल्ह्यात बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने महाविकास आघाडीला यश मिळवून दिले. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. काँग्रेसला नगर जिल्ह्यात चांगले दिवस असून, जिल्ह्यात सातच्या सात जागा जिंकू, असा विश्वास जयंत वाघ आणि किरण काळे यांनी व्यक्त केला. यासाठी संघटनात्मक पातळीवर उद्या महासंकल्प मेळावा आयोजित केल्याचे शहराध्यक्ष किरण काळे यांनी सांगितले.

किरण काळे यांनी आजमीतीस बाळासाहेब थोरात राज्यातील सर्वात ज्येष्ठ आमदार आहेत. आगामी विधानसभा तसेच येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वच निवडणुकांसाठी काँग्रेस बळकट करण्याची मोहीम पक्षाने हाती घेतली आहे. नगर दक्षिणेचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विजयात बाळासाहेब थोरात यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. त्यामुळे या विजयाचे किंगमेकर थोरातांचा शहर जिल्हा व ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे सत्कार करण्यात येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com