Nilesh Lanke And Anil Rathod : शशिकला राठोडांची लंकेच्या उपोषणस्थळी एंट्री; कार्यकर्त्यांना आली अनिलभैय्यांची आठवण

Anil Rathod wife Shashikala participated in Nilesh Lanke agitation : अहमदनगर जिल्हा पोलिस दलातील स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांच्या भ्रष्ट कारभाराविरोधात खासदार नीलेश लंके यांचा आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात शिवसेनेचे दिवंगत उपनेते माजी आमदार अनिल राठोड यांच्या पत्नी शशिकला सहभागी झाल्या होत्या.
Nilesh Lanke And Anil Rathod
Nilesh Lanke And Anil RathodSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : शिवसेनेचे दिवंगत उपनेते माजी आमदार अनिलभैय्या राठोड यांच्या आंदोलनाची स्टाईल सर्व नगरकरांच्या अजूनही स्मरणात आहे. अनिलभैय्याचं पोलिसांच्या कार्यपद्धतीशी कधीच जुळलं नाही. पोलिसांकडून अन्याय होतो, याची तक्रार मिळाली की, अनिलभैय्या ओमिनी व्हॅन काढायचे, अन् तडक पोलिस ठाणे गाठायचे. मग मात्र पुढचा धिंगाणा 'शिवसेना स्टाईल'मध्ये सुरू व्हायचा.

खासदार नीलेश लंके यांचे तीन दिवसांपासून पोलिस दलातील मनमानी आणि भ्रष्टाचाराच्या कारभाराविरोधात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात अनिलभैय्या यांच्या पत्नी शशिकला सहभागी झाल्या. यामुळे अनिलभैय्या यांच्या आंदोलनाच्या स्टाईलला उजाळा मिळाला. याशिवाय या आंदोलनस्थळी अनिलभैय्या यांची ओमिनी व्हॅन देखील उभी आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे खासदार नीलेश लंके यांनी अहमदनगर जिल्हा पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांच्या भ्रष्ट कारभाराविरोधात बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. महाविकास आघाडीचे नेते या आंदोलनात सहभागी होऊन उपोषण करत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेचे राज्य सहसचिव तथा माजी आमदार अनिलभैय्या राठोड यांचे पुत्र विक्रम राठोड देखील आंदोलनात सहभागी झाले आहे. ते देखील उपोषण करत आहेत. या आंदोलनात आता अनिलभैय्या यांच्या पत्नी शशिकला यांनी देखील हजेरी लावली. शशिकला आंदोलनस्थळी अचानक आल्या. आंदोलनकर्त्यांबरोबर बसून घेत, आंदोलनाची दिशा समजावून घेतली. यावेळी त्यांच्याबरोबर काही महिला देखील होत्या.

Nilesh Lanke And Anil Rathod
Nilesh Lanke : नीलेश लंकेंना 5 कोटी अन् दरमहा पाकिटाचं आमिष? ; आंदोलनामुळे मध्यस्थीसाठी अनेकांचे फोन!

शशिकला राठोड यांनी खासदार नीलेश लंके यांच्या आंदोलनाची मुद्दा योग्य आहे. त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्यासाठी आले. आमचे साहेब देखील पोलिस (Police) दलातील चुकीच्या प्रवृत्तीविरोधात असेच आंदोलन करायचे. नीलेश लंके यांचे देखील त्यांच्यापद्धतीनेच आंदोलन सुरू असल्याने साहेबांची (अनिल राठोड) आठवण झाली. त्यामुळे आंदोलनात सहभागी होण्यासाठी आले. नगरमध्ये असुरक्षित असे वातावरण आहे. महिलांच्या सुरक्षितेवर कोणी काम करताना दिसत नाही. खासदार नीलेश लंके यांच्या आंदोलनाची प्रशासनाला दखल घ्यावीच लागेल, अस शशिकला राठोड यांनी ठासून सांगितले.

Nilesh Lanke And Anil Rathod
Nilesh Lanke : 'भ्रष्टाचाराचे मडके', खासदार लंकेंचे उपोषण; 'LCB'च्या कारभाराचे धिंडवडे

आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. आंदोलकांचा मुक्काम पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरच आहे. आंदोलनामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांचा सहभाग वाढत आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी झोपण्यासाठी आंदोलकांना जागा पुरत नाही. या आंदोलनस्थळी अनिलभैय्या राठोड वापरत असलेली ओमिनी व्हॅन देखील उभी आहे. या व्हॅनच खासदार नीलेश लंके आणि विक्रम राठोड यांचा रात्रीचा मुक्काम असतो.

माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आज दुपारी आंदोलनात सहभागी झाले. आंदोलनात सहभागी होऊन सर्वसामान्यांनी केलेल्या तक्रारीची माहिती घेतली. खासदार नीलेश लंके यांच्याकडे आंदोलनस्थळी अनेक तक्रारी मिळाल्या आहेत. या तक्रारींवर सुरवातीली तनपुरे आणि लंके यांच्यात ऊहापोह झाला. या तक्रारीबाबत राज्य सरकारचे लक्ष वेधणार असल्याचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com