Nashik Teachers Constituency : अजितदादांच्या भिडूची इच्छा, आमदार व्हायचंच म्हणतोय...

Teachers Constituency : राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्ता पानसरे यांनी नाशिक शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यामुळे त्यांच्यासह भाजप युवा नेते विवेक कोल्हे आणि राजेंद्र विखे यांच्यात उमेदवारीवरून राजकीय चुरश निर्माण झाली आहे.
Datta Pansare
Datta Pansare sarkarnama

Nagar News : अजित पवार गटाचे श्रीगोंद्यातील नेते दत्ता पानसरे यांनी नाशिक शिक्षक विधानपरिषद मतदारसंघासाठी (Nashik Teachers Constituency) शड्डू ठोकला आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार असल्याचे त्यांनी म्हटले. दत्ता पानसरे यांच्या एन्ट्रीमुळे विवेक कोल्हे आणि राजेंद्र विखे यांच्यात तिसरा आल्याने मैदानात कोण टीकणार, याची उत्सुकता लागली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच नाशिक (Nashik) शिक्षक विधानपरिषदेच्या (Teachers Constituency) निवडणुकीला राजकीय रंग चढला आहे. भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांच्यानंतर विखे परिवारातील डाॅ. राजेंद्र विखे यांचा नाव मतदारसंघात चर्चेत आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते महाराष्ट्र राज्य पणन महामंडळाचे अध्यक्ष दत्ता पानसरे देखील निवडणूक लढणार असल्याचे म्हणत आहेत. यामुळे शिक्षकांपेक्षा संस्था चालकांची मतदारसंघावर पक्कड अधिक मजबूत होत चालली आहे. कोणताही राजकीय वारसा नसलेल्या दत्ता पानसरे सामान्य शिक्षक होते. यानंतर त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, अहमदनगर जिल्हा सहकारी बँक संचालक, महाराष्ट्र राज्य पणन महामंडळ अध्यक्ष, अशा विविध राजकीय पदावर काम केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Datta Pansare
MLC Election 2024 : विधान परिषदेची निवडणूक शिक्षकांच्या हातून निसटली, आता रंगणार राजकीय आखाडा?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) श्रीगोंद्यातील दत्ता पानसरे नेते आहेत. शिक्षण संस्थांच्या माध्यमातून त्यांनी नगर आणि पुणे जिल्ह्यात संपर्क आहे. यातच ते महाराष्ट्र राज्य पणन महामंडळाचे अध्यक्ष आहेत. यामुळे दत्ता पानसरे यांच्या 'एन्ट्री'ने तयारीला लागलेले विवेक कोल्हे यांची डोकेदुखी वाढवली आहे. विवेक कोल्हे (Vivek Kolhe) भाजपचे युवा नेते तर, राजेंद्र विखे हे भाजपचे नेते मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांच्या बंधू आहेत. त्यामुळे नाशिक शिक्षक विधानपरिषद मतदारसंघात भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संघर्ष रंगणार, असे चित्र निर्माण झाले आहे.

विवेक कोल्हे यांनी नाशिक शिक्षक मतदारसंघात प्रचारात आघाडी घेतलेली आहे. दहावीचा निकाल लागताच त्यांनी शिक्षकांच्या कौतुकाच्या फलक नाशिक मतदारसंघातील नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदूरबार पाचही जिल्ह्यात लावले होते. याचाच अर्थ विवेक कोल्हे यांची यंत्रणा या मतदारसंघातील प्रत्येक जिल्ह्यात पोहोचली आहे. माजी आमदार स्नेहलता कोल्हे लोकसभा निवडणुकीत सक्रिय नव्हत्या. भाजप (BJP) नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नाराजीची दखल घेतली. यानंतर स्नेहलता यांचे चिरंजीव विवेक कोल्हे नाशिक शिक्षक मतदारसंघात सक्रिय झाले. त्यामुळे विवेक कोल्हे पुढे अपक्ष जरी निवडणुकीला उभे राहिले तरी, त्यांना देवेंद्र फडणवीस यांचा आशीर्वाद असणार आहे.

Datta Pansare
Nashik Division Teacher Constituency Election : उमेदवार शिक्षक की संस्थाचालक यावरून रंगणार 'राजकारण'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com