India Pakistan War : लेकीच्या वाढदिवसाला खास सुट्टी टाकून घरी आले, तेवढ्यात फोन खनानला ; चार तासांत फौजी माघारी

Emotional Story of Soldier Shantaram Sonawane : जळगाव जिल्ह्यातील अमळनेरचे जवान शांताराम सोनवणे (४२) त्यांच्या मुलीचा वाढदिवस होता म्हणून खास सुट्टी टाकून घरी आले होते. मात्र चार तासातच त्यांना ड्युटीवर परतावे लागले.
India Pakistan War
India Pakistan WarSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील अमळनेरचे जवान शांताराम सोनवणे (४२) त्यांच्या मुलीचा वाढदिवस होता म्हणून खास सुट्टी टाकून घरी आले होते. मात्र चार तासातच त्यांना ड्युटीवर परतावे लागले. युद्धजन्य परिस्थितीमुळे त्यांना तातडीने कर्तव्यावर परतण्याचे आदेश आले. आपल्या लाडक्या लेकीचा वाढदिवस घाईघाईत उरकून जवान शांताराम सोनवणे लगेचच कर्तव्यावर रवाना झाले.

भारत पाकिस्तान मधील तणाव वाढला असून युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सुट्टीवर आलेल्या जवानांना तात्काळ देश सेवेसाठी हजर राहण्याचे आदेश मिळाले आहेत. जवानांच्या सुट्टया रद्द करण्यात आल्या आहेत. यात काही जवानांचे नुकतेच लग्न झाले होते. तर काही जवानांचे लग्न जवळ असल्याने जवान घरी आले होते, मात्र या सगळ्यांना पुन्हा कर्तव्यावर परतावे लागले. अशातच अमळनेर तालुक्यातील ढेकूसीम येथील शांताराम प्रताप सोनवणे हे जवान मुलीच्या वाढदिवसासाठी खास सुट्टी टाकून घरी परतले होते. मात्र चार तासातच त्यांनाही माघारी बोलावण्यात आलं.

India Pakistan War
India Attack Pakistan: 19 सेकंदातच खेळ खल्लास! जेथून भारतावर हल्ले तेच पाकिस्तानचे लाँच पॅड उडवले; दहशतवाद्यांचा खात्मा,पहा व्हिडिओ..

शांताराम सोनवणे हे जम्मू-काश्मीरमध्ये सीमा सुरक्षा दलात कार्यरत आहेत. मुलीचा वाढदिवस असल्याने ते सुटीवर आले होते. गुरुवारी ते अमळनेर येथे घरी पोहचले. ते घरी आल्याने त्यांच्या घरी सगळे आनंदी होते. त्यानंतर काही वेळातच त्यांना युद्धजन्य परिस्थितीमुळे तुम्हाला परत यावे लागेल, असा फोन आला. चार तासात त्यांनी मुलीचा वाढदिवस साजरा केला. चार तास परिवारासोबत राहिला मिळाले याचा देखील त्यांना एक आनंद होता. मात्र दुसरीकडे त्यांनी कर्तव्याला प्राधान्य देत पुन्हा लगेचच देशसेवेसाठी ते रवाना झाले.

दरम्यान, अनेक दिवसांनी वडील घरी आल्याने लेकीचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. मात्र तिला काय ठाऊक होते की वडील हे फक्त चार तासासाठीच आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी घरी आले होते. असे असताना देखील परिवारातील सदस्यांनी लेकीचा वाढदिवस उत्साहात साजरा केला पण देशसेवा आधी महत्त्वाची असल्याने शांताराम सोनवणे यांनी ज्या भूमीत जन्मलो त्या भूमीचं रक्षण करण्याचा आजचा दिवस आला आहे. त्यामुळे देश सेवा आधी महत्त्वाची असल्याचं म्हटलं आहे.

India Pakistan War
Territorial Army : भारत पाकिस्तान तणावात टेरिटोरियल आर्मी सक्रिय, महेंद्र सिंग धोनी, नाना पाटेकर युद्ध लढणार?

दरम्यान लोहारा येथील जवान विलास कुंभार हे देखील चुलतभावाचा असलेला विवाह सोडून सीमेवर परतले आहेत. २०१० मध्ये विलास सैन्यदलात भरती झाले. काकाच्या मुलाचे लग्न असल्याने ते सुटी घेऊन गावी आले होते. ते सीआयसीएफ मध्ये अहमदाबाद येथे कार्यरत आहेत. त्यांनाही फोन आल्याने तत्काळ जावे लागले. अमळनेर तालुक्यातील नऊ ते दहा सैनिक वेगवेगळ्या कामांसाठी सुट्टीवर आले होते. त्या सगळ्यांनी देश सेवेला प्राधान्य देत ते कर्तव्यावर रवाना झालेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com