
Ahilyanagar unexploded bomb : राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या परिसरात फाइटर जेट भला पडलेला बॉम्ब फुटला नाही. तो जमिनीमध्ये सात फुटांवर रूतून बसलेला जिवंत बॉम्ब लष्कराकडून निकामी करण्यात आला.
खासदार नीलेश लंके यांनी या जिवंत बॉम्बची दखल घेत, सतर्कता दाखवत लष्करी अधिकाऱ्यांना निकामी करण्याच्या सूचना दिल्या. लष्करी अधिकाऱ्यांनी हा बॉम्ब निकामी केल्यानं मोठं अनर्थ टळला.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारत (India)-पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरमधील लष्करी तळावर युद्धजन्य हालचाली वाढल्या आहेत. यातच लष्काराचा युद्ध सराव देखील वाढला आहे. राहुरी कृषी विद्यापीठालगत असलेल्या केके रेंज परिसरात, लष्करानं युद्ध सरावात फाइटर जेट देखील सहभागी झाले आहेत.
या फाइटर जेटमून दररोज लक्षभेद केला जात आहे. यासाठी भल्या मोठ्या बॉम्बेचा वापर होत आहे. असाच एक बॉम्ब राहुरीच्या वरवंडी इथं फेकल्यानंतर तो फुटलाच नाही. तो जमिनीमध्ये रूतल्याने शेतकऱ्यांच्या (Farmer) जल वाहिनी फुटली. बॉम्बचा आकार पाहून कुणी पुढे जायला तयार नव्हते.
हा बॉम्ब नेमका शेतांत पडला असल्याने तीव्र उन्हामुळे शेतकऱ्यांची पिके जळाण्याची वेळ आली होती. सात दिवस उलटूनही बॉम्ब हटविण्यासंदर्भात काहीही कार्यवाही झाली नव्हती. खासदार नीलेश लंके यांना स्थानिकांनी ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी लष्करी स्टेशन कमांडर आणि लष्करी अधिकाऱ्यांसमवेत पार पडलेल्या बैठकीत हा बॉम्ब निकामी करण्याचे निर्देश दिले.
या बैठकीत नागरीकांनाही सहभागी करून घेण्यात आले होते. युद्ध सरावावेळी सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे यावेळी बैठकीत मान्य करण्यात आले. एक मे रोजी लष्करी तज्ञांच्या पथकाने हा जिवंत बॉम्ब सुरक्षितपणे काढून तो आपल्या ताब्यात घेतला. हा बॉम्ब पुढे लष्कराने निकामी केल्याची माहिती स्टेशन कमांडर यांनी आपल्याला दिल्याची माहिती खासदार लंकेंनी दिली.
स्थानिक शेतकरी, नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन कारवाई केल्याने खासदार नीलेश लंके यांनी लष्काराचे आभार मानले. लष्कराकडून नागरिकांशी साधलेला संवाद, आश्वासक होता. लष्करी प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. देशाच्या सुरक्षिततेसाठी लष्कराला देखील आवश्यक ते सहकार्य राहील, असे खासदार लंके यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.