Indurikar Maharaj : इंदोरीकर महाराजांना दिलासा; वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी जामीन मंजूर

Sangamner Court : इंदोरीकर महाराज सुनावणीच्या एक दिवस आधीच कोर्टात हजर झाले.
Indurikar Maharaj
Indurikar MaharajSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी अपत्यप्राप्ती संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी इंदोरीकर महाराजांना मोठा दिलासा मिळाला आहे. नगर जिल्ह्यातील संगमनेर न्यायालयाने इंदोरीकर महाराजांना जामीन मंजूर केला आहे. अपत्य प्राप्ती संदर्भात केलेल्या विधानानंतर (पीसी-पीएनडीटी) कायद्याच्या उल्लंघनाप्रकरणी इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल झाला होता.

इंदुरीकर महाराज जामिनासाठी गुरुवारी सकाळी न्यायालयात हजर राहिले होते. यानंतर त्यांना जामीन मंजूर झाला, पण तक्रारदार अंनिसच्या कार्यकर्त्या वकील रंजना गवांदे यांनी यावर कायद्याची लढाई सुरूच राहणार असून, ती त्यांना चुकणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

इंदुरीकर महाराज यांच्यावर दाखल खटल्याची तारीख शुक्रवारी (ता.24) होती. परंतु कीर्तनाच्या कार्यक्रमांच्या व्यस्ततेमुळे ते गुरुवारी (ता.23) एक दिवस आधीच न्यायालयासमोर हजर झाले. संगमनेरच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती वाघमारे यांच्यासमोर वकील के. डी. धुमाळ यांनी इंदुरीकर महाराज यांच्या वतीने जामीन अर्ज सादर केला. न्यायालयाने 20 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर इंदुरीकर महाराज यांना जामीन मंजूर केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Indurikar Maharaj
Shrirampur Politics: श्रीरामपूरमध्ये राजकारण तापलं; बाजार समितीतील सचिवपदाच्या वादाला राजकीय किनार

इंदुरीकर महाराजांच्या जामिनावर सकाळी 11 ते दुपारी एक वाजेदरम्यान न्यायालयीन प्रक्रिया पार पडली. तक्रारदार अंनिसच्या कार्यकर्त्या वकील रंजना गवांदे या न्यायालयात पोहाेचण्याअगोदरच जामिनावरील कार्यवाही पूर्ण झाली होती. जामिनावर कार्यवाही कशी झाली, याची फाइलदेखील तक्रारदाराला बघायला मिळाली नाही.

अंनिसच्या कार्यकर्त्या तथा वकील रंजना गवांदे म्हणाल्या, "कायदे आणि न्याय व्यवस्थेपेक्षा कोणीही मोठे नाही. चुकीचे वागला आहात. त्यामुळे त्यांना सर्व प्रक्रियेला सामोरे जावे लागतेच. समन्स बजावूनदेखील दोन वेळा गैरहजर राहिले होते. त्यामुळे तो खऱ्या अर्थाने न्यायालयाचा अवमानच होता. असे असले तरी कायदेशीर प्रक्रियेला इंदुरीकरांना सामोरे जावेच लागले. न्यायालयात हजर राहावेच लागले. पुढची कायद्याची लढाई सुरूच राहील. न्यायालयात शुक्रवारी नियमित सुनावणी आहे. त्यावेळी बाजू मांडू", असेही गवांदे म्हणाल्या.

इंदुरीकर महाराज यांनी अडीच वर्षांपूर्वी अपत्य प्राप्तीसंदर्भात वादग्रस्त विधान केले होते. या विधानावर अंनिस कार्यकर्त्या वकील रंजना गवांदे यांनी हरकत घेतली. न्यायालयात दाखल खासगी तक्रारीची ही लढाई सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेली. सर्वोच्च न्यायालयाने खटला चालवण्याचा आदेश दिला. यानुसार संगमनेर न्यायालयात खटला सुरू झाला. गेल्या दोन सुनावणीवेळी न्यायालयाने समन्स काढूनदेखील इंदुरीकर महाराज उपस्थित नव्हते. यावर तक्रारदाराने उपअधीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यामार्फत समन्स बजावण्याची न्यायालयाकडे विनंती केली होती. त्यानुसार कार्यवाहीदेखील झाली होती.

इंदोरीकर महाराज एक दिवस आधीच कोर्टात हजर

इंदुरीकर महाराज यांच्यावर दाखल खटल्याची सुनावणी शुक्रवारी होती. परंतु ते आजच न्यायालयासमोर हजर झाले. कीर्तनाच्या तारखा निश्चित असल्याने त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर राहता आले नसते. त्यामुळे इंदुरीकर महाराज आजच न्यायालयात हजर झाले, अशी माहिती त्यांचे वकील के. डी. धुमाळ यांनी दिली. इंदुरीकर महाराज यांचे उद्या पुरंदर, दौंड आणि नारायणगाव येथे कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.

(Edited By - Ganesh Thombare)

Indurikar Maharaj
Indurikar Maharaj News: इंदुरीकर महाराज पोलिसांना सापडेनात; पोलिसांचा न्यायालयात रिपोर्ट

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com