Muslim Society Problems : मुस्लिम समाजावर हल्ल्यांसह सामाजिक, राजकीय, प्रशासकीय पातळीवर अन्याय - शौकत तांबोली

Tanjime Momeneen : नगरमध्ये पार पडली 'मुस्लिम समाजाची अधोगती' या विषायावर विचारमंथन बैठक
Tanjime Momeneen
Tanjime MomeneenSarakrnama
Published on
Updated on

Ahmednagar News : मुस्लिम समजावर विविध ठिकाणी होणारा अन्याय पाहता, नगर शहरात मुस्लिम समाजाची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यामध्ये मुस्लिम समाजावर होणाऱ्या हल्ल्यांबरोबरच सामाजिक, राजकीय, प्रशासकीय पातळीवर होत असलेल्या अन्यायाबाबत उहापोह झाला.

मुस्लिम(Muslim ) समाजाला महसूल आणि पोलीस प्रशासनाबरोबर राजकीय नेत्यांकडून न्याय मिळत नाही. मुस्लिम समाजाला शैक्षणिक, आर्थिक, औद्योगिक, वैद्यकीय व वक्फसारख्या विभागात मुसंडी घेतल्यानंतर प्रगती होईल. याकडे तंन्जिमे मोमेनीनचे अध्यक्ष शौकत तांबोली यांनी लक्ष वेधले.

अकलियत सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था आणि तंन्जिमे मोमेनीन मार्फत मुस्लिम समाजाची अधोगती या विषायावर विचारमंथन बैठक झाली. यावेळी अब्दुस सलाम खोकर, आर्किटेक्ट अर्शद शेख, डॉ. इमरान शेख, डॉ. जहीर मुजावर, हाफिज जहागिरदार, फारुक बिलाल, मुबीन खान, उद्योजक करीम हुंडेकरी उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Tanjime Momeneen
Nagpur Winter Session : शिक्षक भरतीवरुन रोहित पवार कडाडले ; शिक्षणमंत्री खोटे बोलतात..!

शौकत तांबोली म्हणाले, "मुस्लिम समाजावर देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी मॉम्बलिंचिंग, लव्ह जिहाद, बुरखा, मांसाहार अशा कारणांतून हल्ले होत आहेत. पोलीस, महसूल व राजकीय नेत्यांकडून समाजाला न्याय मिळत नाही. समाजात काम करणारे कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षात अडकून बसलेत. यांचा सामना करण्यासाठी मुस्लिम समाजाला शैक्षणिक, आर्थिक, औद्योगिक, वैद्यकीय आणि वक्फसारख्या विभागांमध्ये पुढे यावे लागेल.''

याचबरोबर ''या क्षेत्रातील मागासलेपण दूर झाल्याशिवाय मुस्लिम समाजाची प्रगती होणार नाही. मुस्लिम समाजात धार्मिक कार्य मोठ्या प्रमाणात होतात. पण आपल्या धार्मिक मतभेदामुळे आपसातच मनभेद वाढले आहेत. यामध्ये न पडता आजच्या पिढीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. व्यसनाच्या आहारी जाऊन आरोग्य नष्ट होत आहे.

अर्ध्या रात्रीपर्यंत सोशल मीडियावर लागून चौक व कट्ट्याची शोभा वाढवली जात आहे. 1947 पासून मुस्लिम समाजाची विविध विभागांमध्ये इतर समाजाच्या तुलनेत प्रगती ऐवजी अधोगती झाली. याला कारणीभूत असलेल्या व्यवस्थेमधून समाजाला स्वतःला मार्ग काढावा लागेल.'' असेही तांबोली यांनी म्हटले.

Tanjime Momeneen
Maratha Reservation : '...तर आपलं जमणार नाही', शिष्टमंडळाला जरांगे-पाटलांनी थेट सुनावलं

याशिवाय ''नोकरीच्या मागे न लागता स्वयंम रोजगार निर्माण करुन इतरांना रोजगार देण्याचे काम करावे लागेल. त्यासाठी विविध विभागातून शासकीय योजनांचा उपभोग कसा घेता येईल यासाठी प्रयत्न करावे लागेल. यासाठी नगर येथे मुस्लिम चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना करण्यात आली आहे.'' अशी माहिती शौकत तांबोली यांनी दिली.

मुस्लिम समाजाच्या ताब्यात असलेल्या वक्फ मिळकतीचा समाजासाठी कसा फायदा कसा होईल, याबाबत योग्य ती दिशा ठरवण्याचे या बैठकीत निश्चित करण्यात आले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com