Nashik Income Tax Raid: तीन हजार कोटींच्या `आयकर` धाडींशी संबंधित नाशिकचा नेता कोण?

Nashik Income Tax Raid: नाशिकच्या बांधकाम व्यावसायिकांच्या गत १५ वर्षांतील ३३०० कोटींचे व्यावहार टार्गेटवर
Income Tax Raid
Income Tax RaidSarkarnama

Nashik News : नाशिक शहरातील सहा बांधकाम व्यावसायिकांवर गेल्या आठवड्यात प्राप्तीकर विभागाने छापे टाकून तपासणी केली. यात त्यांनी गेल्या पंधरा वर्षातील तीन हजार तीनशे कोटींच्या व्यावहाराची तपासणी केली आहे. या धाडी सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. त्याचा संबंध बांधकाम व्यावसायिक व त्याच्याशी संबंधीतांचे शिंदे गटाच्या नेत्यांशी जोडला जात असल्याने तो चर्चेचा विषय आहे. (Income Tax department made a scruitiny of various builders of the city) (Political Breaking News)

आयकर विभागाने (Income tax) सहा मोठ्या बांधकाम व्यावसायिकांवर धाडी घातल्या. त्याचे काम पाच दिवस सुरु होते. त्यातील एक बांधकाम व्यावसायिकाचा (Builders) थेट संबंध शिंदे गटाच्या (Eknath Shinde) मोठ्या लोकप्रतिनिधी व नेत्याशी आहे. त्यामुळे शहरातील (Nashik) आयकर विभागाच्या या छाप्यांतील राजकीय कनेक्शन चर्चेत आले आहे.

Income Tax Raid
Shivsena Nashik news : शिंदे गटाच्या आक्रमकतेने भाजप आमदार अस्वस्थ!

शहर व परिसरातील बड्या बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाच्या पथकाने छापे टाकले. ही कारवाई संपली असुन विविध कागदपत्र सील केले आहेत. त्यात तब्बल तीन हजार तीनशे कोटींचे मालमत्तेचे व्यवहार टार्गेटवर आले आहेत. साडेपाच कोटींची रोकड व दागिनेही जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान, ९० दिवसात या कारवाई अहवाल तयार करून तो अवलोकन करण्यासाठी सुपूर्द केला जाणार आहे. त्यानंतर हा अहवाल पुढील कारवाईसाठी केंद्रीय पथकाकडे जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (Latest Nashik News)

नाशिकच्या आयकर अन्वेषण विभागासह छत्रपती संभाजीनगर, ठाणे, पुणे व मुंबई नागपूर कार्यालयातील सुमारे २२५ अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या ९० हून अधिक वाहनांच्या ताफ्यातून आलेल्या पथकांनी बांधकाम व्यावसायिकांची कार्यालये, बंगले, फार्म हाऊसवर छापे टाकले. २० एप्रिल रोजी पहाटे सहा वाजेच्या सुमारास सुरु झालेली कारवाई २५ एप्रिलपर्यंत चालली.

Income Tax Raid
Eknath Khadse News : बाजार समिती निवडणूक विधानसभेची रंगीत तालिम

इगतपुरीत ८० कोटींचे घबाड

आयकर विभागाचे नाशिक शहरात ठिकठिकाणी छापासत्र सुरू असतानाच त्याच पथकातील काही पथकांना बेहिशोबी कागदपत्रे आढळून आल्याने त्यांनी इगतपुरी शहरातील लॉटरी व्यावसायिकाकडे छापा टाकला. यात सुमारे १५ अधिकाऱ्यांनी तळ ठोकून दिवसभर चौकशी केली. या छाप्यात सुमारे ८० कोटींची बेहिशोबी मालमत्ता आढळून आल्याचे समजते. (Political Short Videos)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com