Bodwad Bazar Samiti Election: येथील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीतील मुक्ताईनगर मतदारसंघात विधानसभेची रंगीत तालीम म्हणून बघितले जात आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे, आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. यानिमित्ताने सर्व खडसे विरोधकांनी आमदार पाटील यांच्यामागे शक्ती उभी केली आहे. त्यामुळे खडसे अतिशय सावधपणे पावले टाकत आहेत. (All Eknath Khadse resistive given backing to Chandrakant Patil in APMC election)
राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे मुक्ताईनगरच्या (Jlagaon) राजकारणात परस्परांचे कट्टर विरोधक आहेत. त्यांनी बाजार समितीच्या निवडणुकीत (APMC election) ते सर्वशक्तीनीशी उतरले आहेत. त्यामुळे या निवडणुकीला विधानसभेचे स्वरूप आले आहे.
मुक्ताईनगरच्या कोणत्याही निवडणुकीत एकनाथ खडसे मैदानात उतरले की त्यांचे सर्व विरोधक एकत्र येतात. त्यात खडसे विरोधकांना आयतीच रसद मिळते. विशेषतः ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन खडसेंच्या मार्गात आडवे येतात. या निवडणुकीतही तसेच झाले आहे. खडसे यांनी महाविकास आघाडीचे पॅनेल केले आहे. त्यांच्याविरोधात आमदार पाटील यांचे शिवसेना, भाजपचे पॅनेल आहे. त्यांना मंत्री गिरीश महाजन यांसह विविध खडसे विरोधकांची मदत मिळत आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलला आहे. वरवर बाजार समितीची ही निवडणूक विधानसभेची रंगीत तालीम बनली आहे.
या निवडणुकीसाठी बोदवड, मुक्ताईनगर, कुऱ्हा, उंचदे अशा चार ठिकाणी मतदान केंद्र राहणार असून, हमाल- मापाडी, व्यापारी मतदान केंद्र हे फक्त बोदवडमध्येच ठेवण्यात आले आहे. बोदवड येथे तिरबरडिया मराठी मुलांच्या शाळेत मतदान केंद्र आहेत.
मुक्ताईनगर, उंचदे, कुऱ्हा जिल्हा परिषद शाळेत मतदान केंद्र राहणार आहे. या राष्ट्रवादी शेतकरी पॅनल व भाजप- सेना युतीचे शेतकरी परिवर्तन पॅनल असे दोन पॅनल एकमेकांसमोर उभे ठाकले असून, काँग्रेस पक्षाच्या उमेदवार तटस्थ आहेत. निवडणुकीत ४३ उमेदवार रिंगणात आहेत.
या निवडणुकीसाठी मुक्ताईनगर मतदारसंघातून मुक्ताईनगर तालुक्यातील २८ सहकारी संस्था, बोदवड तालुक्यातील ३८ सहकारी संस्था व वरणगाव विभागातील १४ सहकारी संस्था अशा एकूण ८० सहकारी संस्थाचे मतदान आहे. सहकारी संस्था मतदारसंघातून ११ संचालकांची निवड होणार असून, त्यासाठी ९७७ मतदार संख्या आहे.
ग्रामपंचायत मतदारसंघातून मुक्ताईनगर तालुक्यातील ६४ ग्रामपंचायत, बोदवड तालुक्यातील ३८ ग्रामपंचायत आणि वरणगाव विभागातील १९ ग्रामपंचायत अशा एकूण ११८ ग्रामपंचायतीचा सहभाग निवडणुकीत असून, १०३४ मतदार ग्रामपंचायत मतदारसंघात असून, या ग्रामपंचायत मतदारसंघातून ४ संचालक निवडले जातील. त्याचप्रमाणे व्यापारी मतदारसंघाचे १९५ मतदार असून, यातून एक संचालक निवडला तसाच हमाल मापाडी मतदार संघातून देखील एक संचालक निवडला जातो. या मतदारसंघातून १०७ मतदार असून, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १८ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. बाजार समितीमध्ये बोदवड तालुक्यातील ५१ गावे तर मुक्ताईनगर तालुक्यातील ८० गावे व वरणगाव विभागातील २६ गावांचा समावेश होतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.