Nilesh Lanke News : लंकेंचे पत्ते ओपन होत असताना राम शिंदेंची भूमिका 'गुलदस्त्यात'!

NCP News : आमदार निलेश लंके लोकसभा 2024 साठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगर दक्षिणेचे उमेदवार असतील असे संकेत पुन्हा एकदा मिळत आहेत.
Nilesh Lanke, Ram Shinde Nerws
Nilesh Lanke, Ram Shinde Nerws Sarkarnama
Published on
Updated on

Ahnadnagar News : आमदार निलेश लंके लोकसभा 2024 साठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगर दक्षिणेचे उमेदवार असतील असे संकेत पुन्हा एकदा मिळत आहेत. राष्ट्रवादी पक्षातील फुटी अगोदर ही गोष्ट जवळपास स्पष्ट होती. मात्र, अजित पवारांनी घेतलेल्या भूमिकेनंतर लंके ही निवडणूक लढवणार नाहीत असे वाटत होते. पण लोकसभा निवडणूक लढवणार अशी त्यांची भूमिका आता स्पष्ट होत आहे. यात काही महिन्यांपूर्वी भाजप (BJP) आमदार राम शिंदे सध्या उमेदवारीसाठी किती आग्रही असणार आहे हे ही पाहावे लागणार आहे.

त्याचबरोबर आता महायुतीत एकत्र आलेले असताना लंके आणि खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांच्यातील सातत्यपूर्ण उडणारे खटके पाहता आणि आज ( ता.16) अजितदादांनी लंके यांच्याबाबत केलेले कौतुक पाहता लंकेंना पाठबळ मिळत असल्याचे बोलले जात आहे. अशात अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीतील बंडापूर्वी शिंदे यांनी 2024 लोकसभेसाठी पक्ष श्रेष्ठीकडे मागणी करत तसे माध्यमात कबूल केले होते. सद्य परस्थितीत आता शिंदे यांची भूमिका काय हे मात्र गुलदस्त्यात असल्याचे दिसून येत आहे. वास्तविक त्यांनी आपण पक्षाशी एकनिष्ठ असून आपण 2014 पासून लोकसभा उमेदवारीसाठी पक्षाकडे मागणी करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Nilesh Lanke, Ram Shinde Nerws
Nana Patole News : माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकरांनी उल्लेख केलेले 'दादा' कोण ? पटोलेंनी ठिणगी टाकली

ज्या पद्धतीने लंके आणि त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस यासाठी व्युव्हरचना आखत असताना शिंदे यांची भूमिका किती आग्रही आहे, हे मात्र गुलदस्त्यात आहे. जवळपास अडीच-तीन वर्षांअगोदर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पारनेरमध्ये एका कार्यक्रमात लंके यांचा जिल्ह्यातील जनसंपर्क, युवकांमध्ये असलेली लोकप्रियता, त्यांच्यातील सर्वसामान्यपणा, बडेजाव नसणारा स्वभाव, राज्यात त्यांच्या उपक्रमामुळे वाढलेली लोकप्रियता यावर भाष्य करताना ते जिल्ह्याचे नेतृत्व करू शकतात, अशा अर्थाने वक्तव्य केले होते. त्याच वेळी माध्यमांनी लंके यांना आपण खासदारकी लढवणार का असा प्रश्न विचारला होता.

त्यावर लंके यांनी पक्ष देईल तो आदेश असे उत्तर दिले होते. त्यावरूनच लोकसभेची नगर दक्षिणेत प्रभावी उमेदवारा अभावी पक्षाचा होणारा पराभव पाहता लोकसभेसाठी राष्ट्रवादीने लंके यांचे नाव पक्षाने अंतिम करून त्यांना साहेबांनी कामाला लागण्याचे आदेश दिल्याचे स्पष्ट झाले होते. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमधे (NCP) अजित पवारांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मोठे बंड झाले. अजित पवारांसोबत मूळ राष्ट्रवादीतील मोठा गट गेला. त्यात पारनेरचे आमदार निलेश लंके यांनीही अजितदादांची साथ दिली.

आता लोकसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. लोकसभा निवडणुकांनंतर विधानसभेच्या निवडणुका असणार आहेत. अशात लोकसभेसाठी ज्या काही मोजक्या जागांवर अजित पवार गटाचा दबदबा असणार आहे अशात नगर दक्षिणेची जागा मानली जात आहे. राज्याबरोबर केंद्रातही वजन वाढवायचे असेल तर लोकसभेत अजित पवार गटाला प्रतिनिधी असणे गरजेचे आहे. त्यामुळे लंकेना लोकसभेसाठी मूक समंतीद्वारे पुढची चाल दिली जात असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

या परस्थितीत महायुतीमध्ये भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये नगर दक्षिणेच्या जागेवरून वाद होऊ शकतो. त्याच बरोबर काही महिन्यांपूर्वी याच नगर दक्षिणेच्या जागेवर पक्षाचेच सुजय विखे विद्यमान खासदार असताना राम शिंदेंनी मोठा दावा पुढे केला होता. मात्र, अजित पवार महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर शिंदे यांनी याबाबत आपली भूमिका कायम असल्याचे सांगितले, असले तरी त्यांच्यातील यासाठीचा पूर्वीचा अग्रहीपणा किती ही बाब सध्या गुलदस्त्यात आहे. त्यामुळे सुजय विखे यांच्यासमोर 2024 च्या लोकसभा उमेदवारीसाठी एकीकडे महायुतीतील सहकारी पक्षाचे तर दुसरीकडे पक्षातीलच आमदाराचे आव्हान असणार आहे का हे पाहावे लागणार आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Nilesh Lanke, Ram Shinde Nerws
Manoj Jarange Patil News : मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात जरांगे पाटलांची तोफ धडाडणार; दहिवडीत जाहीर सभा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com