Raksha Khadse News : केळी उत्पादक घटवणार रक्षा खडसे यांचे मताधिक्य?

Congress MLA Suresh Chaudhary : काँग्रेसचे आमदार सुरेश चौधरी यांनी महाविकास आघाडीसाठी रावेरमध्ये लावला जोर
Raksha Khadse
Raksha KhadseSarkarnama

Raver Loksabha Constituency News: रावेर लोकसभा मतदार संघात भाजपच्या रक्षा खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीराम पाटील यांच्यात थेट लढत आहे. रावेर आणि केळी हे एक समीकरण आहे. या समीकरणा भोवती यंदाची निवडणूक फिरत होती.

महायुतीच्या उमेदवार खासदार रक्षा खडसे(Raksha Khadse) यंदा हॅट्रिकसाठी मैदानात उतरल्या आहेत. खडसे राजकीय फॅक्टर मुळे प्रारंभी रक्षा खडसे यांची उमेदवारी अनिश्चित होती. मात्र शेवटच्या टप्प्यात खडसे यांनी दिल्लीतून फिरविलेली चक्रे आणि स्थानिक राजकारण यामुळे ही अनिश्चितता संपुष्टात आली.

भाजपच्या पहिल्याच यादीत त्यांचे नाव होते. त्यामुळे त्यांना प्रचारासाठी जवळपास दोन महिन्यांचा कालावधी मिळाला. त्याचा खासदार खडसे यांनी पुरेपूर उपयोग करून घेतला.(Raver Loksabha Constituency)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Raksha Khadse
Sarkarnama Analysis Dindori Loksabha : निवडणूक लोकसभेची! परीक्षा मात्र अनिल कदम अन् दिलीप बनकरांच्या वर्चस्वाची

महाविकास आघाडीने रावेर मतदार संघ शरद पवार(Sharad Pawar) गटाला सोडला होता. शरद पवार यांच्याकडून माजी मंत्री एकनाथ खडसे यांना उमेदवारी अपेक्षित होती. मात्र ऐनवेळी खडसे यांनी नकार दिल्याने नव्या उमेदवाराचा शोध घ्यावा लागला. यामध्ये दोन महिन्यांपूर्वी उमेदवारीसाठी भाजपमध्ये गेलेल्या श्रीराम पाटील यांनी राजकीय परिस्थितीचा अंदाज घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. निवडणुकीच्या महिनाभर आधी त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. या महिनाभरात त्यांनी घेतलेले परिश्रम आणि नेत्यांची मदत यामुळे शेवटच्या टप्प्यात त्यांनी चांगले वातावरण उभे केले होते.

या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे श्रीराम पाटील(Shriram Patil) यांची राजकारणात पाटी कोरी होती. त्यामुळे विरोधकांना त्यांच्या विरोधात टीका करण्यासाठी मुद्दाच मिळाला नाही. श्रीराम पाटील यांनी भाजप अथवा पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करणे टाळले. त्यांनी प्रामुख्याने शेतकऱ्यांचे प्रश्न आणि मतदारसंघाचा विकास यावर भर दिला होता.

दहा हजार केळी उत्पादकांना विम्याची रक्कम मिळाली नाही. पंचनामे होऊ नये १२ कोटी रुपयांची भरपाई प्रलंबित आहे. रावेर मतदार संघासाठी अत्यंत उपयुक्त अशी मेगा रिचार्ज योजना रेंगाळली आहे. रावेर, सावदा, आणि निंभोरा ही तीन रेल्वे स्थानके आहेत. येथे कोणतीही महत्त्वाची गाडी थांबत नाही. रेल्वेच्या अनेक समस्या आहेत. केळी निर्यातीत वाढ झालेली नाही. केंद्र शासनाच्या धोरणामुळे शेतकऱ्यांची झालेली कोंडी हा अतिशय गंभीर प्रश्न महाविकास आघाडीने उपस्थित केला. त्याला शेतकऱ्यांचा प्रतिसादही मिळाला.

Raksha Khadse
Lok Sabha Election 2024 : मतमोजणीसाठी 900 कर्मचाऱ्यांची नियुक्ती, प्रशिक्षणाला गैरहजर राहिल्यास...

या मतदारसंघात गेल्या तीन निवडणुकांपासून भारतीय जनता पक्षाचा(BJP) उमेदवार विजयी होत आला आहे. गेल्या निवडणुकीत रक्षा खडसे यांना ३९ हजारांचे मताधिक्य रावेर मधून मिळाले होते. गतवर्षी ६६.७४ टक्के मतदान झाले होते. यंदा ते ७०.८१ असे जवळपास १७ हजार मतांनी वाढले. या वाढलेल्या मतांचा फटका कोणाला बसतो? याची अतिशय उत्सुकता आहे. मराठा आणि मुस्लिम समाज या निवडणुकीत महायुतीच्या विरोधात आक्रमकपणे मतदान केंद्रांवर पोहोचला होता.

काँग्रेसचे(Congress) आमदार शिरीष चौधरी आणि त्यांचे सहकारी राजेंद्र पाटील, किशोर पाटील, योगीराज पवार यांसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी एक दिलाने प्रचारात उतरले होते. त्या तुलनेत महायुतीच्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे ग्राउंड लेव्हलला फारसे नेटवर्क नव्हते. त्यामुळे रक्षा खडसे यांना गत निवडणुकीतील मताधिक्य राखणे अवघड आहे. असा या मतदारसंघाचा कल आहे. त्यामुळे रावेर मतदार संघ यंदा विशेष चर्चेचा विषय ठरेल.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com