School Nutrition Food : ''शाकाहारी विद्यार्थ्यांना मांसाहारी बनवण्याचे शासनाचे हे षडयंत्र आहे का?'' जैन समाजाचा सवाल!

Government Decision : शालेय विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात अंड्याच्या समावेशावरून वाद ; जैन समाज, वारकरी संप्रदाय आक्रमक
School Nutrition Food
School Nutrition FoodSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : शासनाने शालेय पोषण आहारातून विद्यार्थ्यांना उकडलेली अंडी देण्याचा निर्णयावरून वाद सुरू झाला. जैन समाज, वारकरी संप्रदायाबरोबर शाकाहारी कुटुंबांना ठेच पोहोचविणारा हा निर्णय असल्याचे बोलले जात आहे.

या निर्णयाविरोधात सकल जैन समाज आक्रमक झाला आहे. शाकाहारी विद्यार्थ्यांना नळकतपणे मांसाहारी बनवण्याचे शासनाने हे षडयंत्र रचले आहे का? असा संतप्त सवाल जैन समाजाने घेतलेल्या बैठकीद्वारे केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

School Nutrition Food
Uddhav Thackeray On BJP : उद्धव ठाकरेंनी दाबली होती भाजप, संघाची दुखरी नस...

प्रधानमंत्री पोषण निर्माण योजनेंतर्गत राज्य सरकार शालेय पोषण आहार सुरू करत आहे. या पोषण आहारात अंड्यांचा समावेश करण्याची विनंती कृषी विभागाने केली आहे. अंड्यांमुळे विद्यार्थ्यांची वाढ चांगल्या प्रकारे होऊन त्यांची रोग प्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते, असे कृषी विभागाने म्हटले आहे.

परंतु पोषण आहारापेक्षा इतर शाकाहारी पदार्थांमध्ये चांगली पोषण मूल्य असतात. त्यामुळे फक्त अंडी देणे हा विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ आहे. शाळांमध्ये जैन समाजाची, वारकरी संप्रदायाबरोबर इतर समाजातील मुले-मुली शाकाहारी जेवण जेवतात. शाळेत एकत्र डबा खातात. त्यांना शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांचे म्हणावे तेवढे ज्ञान नसते.

School Nutrition Food
Udayanraje Bhosale : मनोज जरांगेंना उदयनराजे भोसलेंचे बळ; साताऱ्यात नेमकं काय घडलं ?

बालसुलभ उत्सुकतेमुळे अंडी खाणारी मुलांना पाहून पूर्ण शाकाहारी कुटुंबातील मुला-मुलींना आकर्षण वाटू शकते. त्यांनाही खाण्याचा मोह होऊ शकतो. म्हणजेच शाकाहारी विद्यार्थ्यांना नकळतपणे मांसाहारी बनविण्याचे हे षडयंत्र शासनाने रचले आहे का? असा प्रश्न येथे उपस्थित होतो.

School Nutrition Food
Ahmednagar News : खासदाराने मांडली कैफियत, मुख्यमंत्र्यांचा फोन अन् शेतकऱ्यांना दीड टीएमसी पाण्याची भेट

हा विषय वरकरणी सोपा वाटत असला, तरी गंभीर आहे. या मागे वाद लपलेला आहे. यामुळे हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी कापड बाजार जैन मंदिराचे अध्यक्ष सुभाष मुथा यांनी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देण्यात आले.

शासनाला दिलेल्या निवेदनात जैन सकल समाजाच्या वतीने या निर्णयाचा जैन समाजाचे प्राणीमित्र अनिल कटारिया, बडीसाजन जैन समाजाचे अध्यक्ष पेमराज बोथरा, महावीर बडजाते, संजय महाराज, महावीर गोसावी, नरेंद्र लोहाडे, रवींद्र बाकलीवाल, वकील संतोष भोसे, वकील संपतलाल बोरा यांनी तीव्र निषेध केला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com