Ahmednagar News : खासदाराने मांडली कैफियत, मुख्यमंत्र्यांचा फोन अन् शेतकऱ्यांना दीड टीएमसी पाण्याची भेट

Ahmednagar Farmers Water Issue : शेतकऱ्यांसाठी खासदारांनी धडपड केली आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या एका फोनने काम झाले...
CM Eknath Shinde, Sadashiv Lokhande
CM Eknath Shinde, Sadashiv Lokhande Sarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar Politics : नगर जिल्ह्याचे राजकारण नेहमीच पाण्याभोवती फिरते. यंदा तर दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे तीव्र पाणीटंचाईची शक्यता आहे. यातच लोकसभा, विधानसभा निवडणुका येऊ घातल्याने पाण्याभोवती राजकारणाला महत्त्व आले आहे. निळवंडे धरणाचे पाणी सध्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरले आहे. खासदार सदाशिव लोखंडे यांनी हे हेरले आहे. मुख्यमंत्र्यांची त्यांनी भेट घेतली अन् जलसंपदा विभागाद्वारे निळवंडेतून आणखी दीड टीएमसी पाणी सोडले जाणार आहे.

CM Eknath Shinde, Sadashiv Lokhande
Balasaheb Thorat And Vikhe : बाळासाहेब थोरातांची साद अन् विखे पाटील धावून आले! नेमकं काय झालं ?

खासदार सदाशिव लोखंडे यांच्याकडे निळवंडे धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या आणि ते पाणी ओढ्यात, तळ्यात साठवून ठेवणाऱ्या शेतकऱ्यांनी पाणी सोडण्याची विनंती केली होती. उन्हाच्या झळा तीव्र आहे. हाताशी आलेले पीक पाण्याअभावी जाण्याची भीती व्यक्त केली. शेतकऱ्यांची कैफियत खासदार लोखंडे यांच्या लक्षात आली. निळवंडे धरणातून पाणी मिळेल का, याची सुरुवातील प्रशासकीय पातळीवर चाचपणी केली. जलसंपदा विभागातून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. यावर खासदार लोखंडे यांनी मुंबई गाठली. तिथे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या कैफियतकडे खासदार लोखंडे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे लक्ष वेधले. मुख्यमंत्री शिंदे यांना लगेचच जलसंपदा विभागचे सचिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवर जोडून दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निळवंडे धरणातील पाण्याचा आढावा घेतला. यातच लगेचच निळवंडे धरणातून आणखी दीड टीएमसी पाणी सोडण्याच्या सूचना केल्या. या सूचनांमुळे वितरिका नसलेल्या निळवंडे धरणाचे पाणी ओढ्यात आणि तळ्यात साठवू पाहणाऱ्या दुष्काळी टापूतील शेतकऱ्यांना या पाण्यामुळे दिलासा मिळणार आहे. दुष्काळी टापूतील विविध गावांतील बंधारे, ओढे तसेच शेततलाव तुडुंब भरू दिले जातील. खासदार लोखंडे यांनी या पाण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, भाजपचे जिल्हा सरचिटणीस निनीत कापसे, बाजीराव दराडे, निळवंडे समितीचे अध्यक्ष नानासाहेब शेळके, उत्तम घोरपडे, सदाशिव गोंदकर, प्रकाश चित्ते यांनी सत्कार केला.

CM Eknath Shinde, Sadashiv Lokhande
Jayakwadi Water Issue : आता विखेंच्या 'पद्मश्री' कारखान्यानेही 'जायकवाडी' प्रश्नी घेतली न्यायालयीन उडी!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com