Jain Student Hostel : जैन समाजासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; मुंबईसह 7 शहरांत विद्यार्थी वसतिगृह उभारणार, महिलांसाठी बिनव्याजी कर्जही

Hostels, Interest-Free Loans and New Welfare Schemes Announced Jain Community Students Maharashtra : जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय; कौशल्य विकास, रोजगार, महिला बचत गट आणि 'मराठी जैन साहित्य विश्वकोष' प्रकल्पालाही गती.
Jain Student Hostel
Jain Student HostelSarkarnama
Published on
Updated on

Jain Minority Development Corporation : जैन समाजातील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी राज्यातील सात प्रमुख शहरांमध्ये स्वतंत्र वसतिगृह उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळाने घेतला आहे.

मुंबई, पुणे, नवी मुंबई, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर येथे ही वसतिगृहे उभारण्यात येणार आहेत.

मुंबई (Mumbai) येथील सह्याद्री अतिथीगृहात महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या चौथ्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत शिक्षण, रोजगार, महिला सक्षमीकरण आणि कौशल्य विकासाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या योजनांवरही शिक्कामोर्तब करण्यात आले.

उच्च शिक्षणासाठी राज्यातील विविध भागांत जाणाऱ्या जैन समाजातील विद्यार्थ्यांना (Student) निवासाची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने सात शहरांमध्ये स्वतंत्र विद्यार्थी वसतिगृहे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात प्राप्त मागण्यांचा आढावा घेऊन पुढील कार्यवाही करण्याचेही निश्चित करण्यात आले.

Jain Student Hostel
LIC Stake Sale : भारतावर आर्थिक परिणाम! आता LICसह आठ सरकारी कंपन्यांतील हिस्सा विकणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय

ललित गांधी यांनी राष्ट्रीय स्तरावरील महामंडळाकडून जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळासाठी 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली. बैठकीला सचिव माधवी खोडे-चवरे, व्यवस्थापकीय संचालक मेघना शिंदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि महामंडळाचे सदस्य उपस्थित होते.

Jain Student Hostel
Subhodh Saoji Letter : राम मंदिर कथित देणगी गैरव्यवहार; ट्रस्टचा कारभार लष्कराकडे द्या, सुबोध सावजींचे राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्रानं खळबळ

बैठकीत महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या कर्ज योजना आणि व्याज परतावा योजनांच्या सुधारित प्रारूपास मंजुरी देण्यात आली. याशिवाय 'विहारधाम निर्माण योजना' आणि 'पाठशाळा आधुनिकीकरण व सक्षमीकरण योजना' राबविण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. या योजनांसाठी राज्यव्यापी सर्वेक्षण तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.

महिलांसाठी बिनव्याजी कर्ज योजना

महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी कुटीर उद्योग उभारणाऱ्या महिलांना 10 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. या योजनेचे अर्ज येत्या पंधरवड्यात वितरित करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.

कौशल्य विकास आणि रोजगारावर भर

जैन युवकांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकास विभागाच्या सहकार्याने प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना (CMEGP) आणि इतर रोजगाराभिमुख योजनांचा लाभ अधिकाधिक युवकांपर्यंत पोहोचविण्यासाठी उद्योग विभागाच्या सहकार्याने विशेष अभियान हाती घेण्याचा निर्णय झाला. महिला व बाल विकास विभागाच्या सहकार्याने महिला बचत गटांसाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावरही बैठकीत भर देण्यात आला.

'मराठी जैन साहित्य विश्वकोष' निर्मिती

बैठकीत 'मराठी जैन साहित्य विश्वकोष' तयार करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास व वित्त महामंडळ (NMDFC) कडून निधी उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com