MLA Lahu Kanade : 'जलजीवन मिशन योजने'च्या कामात गोंधळ; आमदार कानडे भडकले

Srirampur Politics : श्रीरामपूर पंचायत समितीत जलजीवन मिशन योजनेच्या कामांची आमदार कानडे यांनी आढावा बैठक घेतली.
MLA Lahu Kanade
MLA Lahu Kanade Sarkarnama
Published on
Updated on

महेश माळवे :

Ahmednagar News: जलजीवन मिशन योजनेच्या कामात सुरू असलेल्या त्रुटींवर व सावळ्या गोंधळावर बोट ठेवत आमदार लहू कानडे यांनी अधिकारी, ग्रामसेवक व ठेकेदारांची चांगलीच कानउघाडणी केली. वाढीव अंदाजपत्रकासह योजना पूर्ण झाल्याशिवाय ती ग्रामपंचायतीच्या ताब्यात देऊ नये, अशी सक्त सूचना त्यांनी यावेळी केली. (MLA Lahu Kanade in Jal Jeevan Mission meeting)

श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभागृहात जल जीवन मिशन योजनेच्या कामांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी योजनेच्या कामात अनेक त्रुटी दिसून आल्याने कानडे यांनी संबंधित अधिकारी, ग्रामसेवक व ठेकेदारांना धारेवर धरले. जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, तालुकाध्यक्ष अरुण नाईक, गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, जीवन प्राधिकरण विभागाचे उपअभियंता गायकवाड, पंचायत समितीचे रविंद्र पिसे उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

MLA Lahu Kanade
Raj Thackeray News : 'टोल का झोल' पोहोचवणार मुख्यमंत्र्याकडे; राज कडाडले

आमदार कानडे म्हणाले, "या योजनेची अंमलबजावणी जशी व्हायला पाहिजे तशी होत नाही. कारेगावच्या योजनेचे काम पूर्ण न होताच योजना हस्तांतरित करून ठेकेदारांना पैसे अदा केले गेले. काम करताना कोणाचा दबाव होता. ही घाई कशासाठी केली, असे प्रश्न उपस्थित करत या गावाची ग्रामसभा बोलवावी, तसे मला अवगत करावे, आपण प्रत्यक्ष पाहणी करू, असे सांगून अनुपस्थित ग्रामसेवकास नोटीस पाठवून केलेल्या कारवाईची माहिती देण्याचे त्यांनी गटविकास अधिकारी सिनारे यांना सुचवले.

गावातील सर्व घरांना पाणी मिळाल्यानंतर योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्यात यावी, असा उल्लेख निविदेत असल्याने वाढीव अंदाजपत्रकासह योजना पूर्ण झाल्यानंतरच ती हस्तांतरीत करावी, नागरिकांनी याबाबत दक्षता घ्यावी, योजनेच्या वितरकांमुळे रस्ते खोदले जाणार असल्याने चांगल्या रस्त्यांची वाट लागणार असल्याचे आपण अधिवेशन काळात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यांनी अशा कामांचे प्रस्ताव सादर करण्याचे सूचित केले आहे. त्यानुसार प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन आमदार कानडे यांनी यावेळी केले.

'योजना केवळ ठेकेदारांसाठी...'

काभोकर येथे चार पाणी टाक्या बांधूनही 10 वर्षे गावाला पाणी मिळाले नाही. त्या योजनेत या टाक्या बाद करून नवीन टाक्या केल्या. जुन्या टाक्यांचा खर्च कोणाकडून वसूल करायचा, योजना केवळ ठेकेदारांसाठी आहेत काय? अशा ठेकेदारांवर फौजदारी कारवाई केली पाहिजे होती. हा जनतेचा पैसा आहे, तो चोरांच्या खिशात घालायला दिला काय ? असा सवाल करून ज्या-ज्या ठिकाणी उपठेकेदार नेमले त्याची माहिती द्यावी,असे आमदार कानडे सांगितले.

(Edited By-Ganesh Thombare)

MLA Lahu Kanade
Ajit pawar Visit Nandurbar : उपमुख्यमंत्री अजित पवारांचे एका दगडात दोन पक्षी; गावित विरोधकांना बळ, काँग्रेसलाही खिंडार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com