Gulabrao Patil : केंद्र सरकारकडून निधीच नाही, म्हणून जलजीवन मिशन ठप्प ; पाणीपुरवठा मंत्री गुलाबरावांची कबुली

Gulabrao Patil On Jal Jeevan Mission : केंद्र सरकारकडून निधी न आल्यामुळे जलजीवन मिशनला खीळ बसल्याची कबुली पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. विधानसभेत प्रश्नोतराच्या तासात ते बोलत होते.
Gulabrao Patil
Gulabrao PatilSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : राज्यातील 'जलजीवन मिशन' अंतर्गत एकुण 51 हजार 560 योजना मंजूर असून, त्यापैकी 25 हजार 61 योजनांची कामे केंद्र सरकारकडून निधी न आल्यामुळे ठप्प झाली असल्याची कबुली राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सोमवारी विधानसभेत दिली.

यासंदर्भात, विधानसभा सदस्य सुभाष देशमुख यांनी जलजीवन मिशन योजेनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनांची कामे बंद असल्याबाबतचा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना निधीची कमतरता असल्यामुळे कामावर विपरित परिणाम झाला असून, कामाची गती मंदावल्याचे गुलाबराव पाटील यांनी कबुल केले.

यावेळी गुलाबराव पाटील यांनी केंद्र सरकारकडून निधी प्राप्त झाला नसल्याचे सांगितले. केंद्र सरकारने सामंजस्य करारासह अन्य बाबींची पुर्तता करण्याची अट घातली आहे. तसेच याबाबतचा प्रस्ताव पुढील काही दिवसांत तयार होऊन तो केंद्र सरकारकडे जाईल. त्यानंतर पुढील निधीचा मार्ग मोकळा होईल, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले. केंद्र सरकारकडून हा निधी प्राप्त झाल्यानंतर ७५ ते ९९ टक्क्यापर्यंत कामे पूर्ण झालेल्या योजनांना प्राधान्य क्रमाने निधी दिला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

Gulabrao Patil
Nashik Kumbh Mela : पंकज भुजबळांचा तारांकित प्रश्न, एकनाथ शिंदेंचं उत्तर ; कुंभमेळ्यापूर्वीच 'त्या' प्रकल्पाची क्षमता वाढवणार

केंद्र सरकारकडून राज्य सरकारला निधी मिळाल्यानंतर योजनांना प्राधान्यक्रम देऊन त्यांची अंमलबजावणी करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. योजना बंद पडू नयेत यासाठी राज्य सरकारने 4800 कोटी रुपये देयकांसाठी दिले आहे. ज्या योजना लवकर पूर्ण होण्याच्या टप्प्यात आहेत, त्यांना प्राधान्य देत क्रमवारीनुसार निधी वितरित केला जाईल. निधीअभावी काही योजना अंशतः थांबलेल्या असल्याचेही गुलाबराव पाटील यांनी मान्य केले.

Gulabrao Patil
BJP leader murder : मॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची चाकूने सपासप वार करत निर्घृण हत्या; परिसरात खळबळ

दरम्यान, राज्यात २६ ते ५० टक्के काम पूर्ण झालेल्या योजनांवर आतापर्यंत १७८२ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. या योजना पूर्णत्वास नेण्यासाठी आणखी ५ हजार ४२२ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले. प्रश्नावरील चर्चेदरम्यान प्रकाश सोळंके, नारायण कुचे, रत्नाकर गुट्टे, तानाजी मुळकुटे, सुहास कांदे या सदस्यांनी सहभाग घेतला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com