

Nashik News : नाशिकमध्ये २०२७ मध्ये सिहस्थ कुंभमेळा आहे. या काळात शहरातील दैनंदिन कचऱ्यात प्रतिदिन अंदाजे २०० मे. टन अतिरिक्त कचरा निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता या कचऱ्याच्या विल्हेवाटासाठी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची क्षमता ११०० मे. टन प्रतिदिन पर्यंत वाढविण्यात येणार असल्याची माहिती आमदार पंकज भुजबळ यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
प्रकल्पाची क्षमता वाढविणे बाबत नाशिक महानगरपालिकेने नियोजन केले असून त्यासाठी प्रिसॉर्टीग, कंपोस्टींग, आरडीएफ युनिट मध्ये अतिरिक्त मशीनरी बसविण्याचे काम सुरु असून त्याव्दारे प्रकल्पाची क्षमता सिंहस्थापूर्वी ११०० टन प्रतिदिन पर्यंत वाढविण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
नाशिकमध्ये दररोज जमा होणारा ८०० ते ८५० मेट्रिक टन घनकचरा कोणत्याही प्रक्रियेविना पाथर्डी डेपोमध्ये टाकला जात आहे. पाथर्डी येथील 'कचरा प्रक्रिया प्रकल्पाची' मूळ क्षमता ही वाढत्या नागरिकरणामुळे अपुरी पडत आहे. येथील यंत्रसामग्री वारंवार नादुरुस्त असल्यामुळे परिसरात दुर्गंधी व प्रदूषणाची समस्या निर्माण होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. गत अनेक वर्षांपासून साचलेल्या लाखो टन कचरा 'बायो-मायनिंग' प्रक्रियेद्वारे नष्ट करण्याच्या कामासाठी नियुक्त कंत्राटदाराने दिलेल्या मुदतीत काम पूर्ण न केल्यामुळे दंड आकारण्यात आला आहे का , असा सवाल पंकज भुजबळांनी उपस्थिती केला.
यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लेखी उत्तर दिलं. नाशिक महानगरपालिके मार्फत बायोमायनिंग प्रक्रियेव्दारे कचरा नष्ट करण्याकामी कुठल्याही स्वतंत्र कंत्राटदाराची नेमणूक केलेली नाही. त्यामुळे मुदतीत काम पूर्ण न केल्यामुळे दंड आकारण्याचा प्रश्न उध्दभवत नाही. सिहस्थ कुंभमेळा २०२७ त्या काळात शहरात दररोज अंदाजे २०० मे. टन अतिरिक्त कचरा निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता प्रकल्पाची क्षमता वाढविणे बाबत नियोजन केलेले आहे. प्रिसॉर्टीग, कंपोस्टींग, आरडीएफ युनिट मध्ये अतिरिक्त मशीनरी बसविण्याचे काम सुरु आहे. त्याव्दारे प्रकल्पाची क्षमता सिंहस्थापूर्वी ११०० टन प्रतिदिन पर्यंत वाढविण्यात येणार आहे.
मनपा मार्फत कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करण्यासाजी वेस्ट टू एनर्जी अथवा मटेरिअल रिकव्हरी फॅसिलीटी उभारण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केलेला नाही. सिंहस्थ विचारात घेता मनपा मार्फत प्रकल्प क्षमता वाढविणे करीता वरील प्रमाणे आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.