Jalgaon Bank Election: रक्षा खडसेंच्या उमेदवारीवरून महायुतीत तणाव; भाजप-शिवसेनेचे पॅनल अडकले, गिरीश महाजनांच्या भूमिकेकडे लक्ष

Jalgaon District Bank Election 2026 : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत रक्षा खडसे यांच्या उमेदवारीवरून महायुतीत तणाव वाढला आहे. भाजप-शिवसेनेचे पॅनल अडचणीत आले असून गिरीश महाजन यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Girish Mahajan
Girish MahajanSarkarnama
Published on: 
Updated on: 

Khadse Vs Mahajan News: जळगाव जिल्हा बँकेत पॅनेल निर्मितीसाठी नेत्यांमधील तिढा सुटला आहे. मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांनी तसे संकेत दिले आहेत. पॅनलच्या घोषणेत मात्र पुन्हा एकदा मुक्ताईनगरचा खडसे फॅक्टर आडवा येण्याची चिन्हे आहेत.

जळगाव जिल्हा बँकेत महायुतीचे पॅनल होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह प्रमुख नेत्यांची बैठक झाली. त्यात राजकीय अडचणी सोडविण्यात यश आले.

आमदार किशोर पाटील यांचे चिरंजीव सुमित पाटील यांचा अर्ज बाद झाला होता. नाशिकच्या सहकार उपनिबंधकांनी त्यावर गुरुवारी निर्णय देत अर्ज वैध ठरवला. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपची अडचण वाढली आहे.

Girish Mahajan
Mahayuti Politics: महायुतीचा अध्यक्षपदाचा उमेदवार ऐनवेळी का बदलला? राजकीय खेळीचा सुगावा लागताच राजेश पाटलांची बाजी!

पडद्यामागून मंत्री गिरीश महाजन तर उघडपणे मुक्ताईनगरचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील आणि भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी खडसे मुक्त मुक्ताईनगर करण्यासाठी चंग बांधला आहे. त्यासाठी देवयानी अनंतराव देशमुख यांचा उमेदवारी अर्ज केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मार्गात आडवा आला आहे.

माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या माध्यमातून केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी उमेदवारीचा हट्ट कायम ठेवला आहे. महिला राखीव आणि सोसायटी अशा दोन्ही गटातून त्यांचे अर्ज आहेत. खडसे समर्थक योगेश कोलते यांनी सोसायटी गटातून उमेदवारी केली आहे. पॅनल निर्मितीच्या राजकीय सोयीसाठी कोलते यांची उमेदवारी आहे. त्यामुळे राज्यमंत्री खडसे महिला आणि सोसायटी या दोन्ही गटांचा पर्याय ठेवून आहेत.

Girish Mahajan
Microsoft Server Down : मायक्रोसॉफ्टचे सर्व्हर अचानक डाऊन! आउटलुक-365 वापरकर्त्यांचे हाल; लॉग-इन करताना उडाली तारांबळ

देवयानी देशमुख यांच्यासाठी ठराव असलेली सोसायटी 2021 मध्येच अवसायानात गेली आहे. देशमुख संचालक झाल्या तेव्हा त्यांचे वय 17 होते. त्यामुळे त्यांचा अर्ज बाद करण्यासाठी सहकार उपनिबंधकांकडे खडसे समर्थकांनी याचिका केली आहे. याचिकेवर काय निर्णय होतो यावर रक्षा खडसे कोणत्या गटातून उमेदवारी करणार हे अवलंबून आहे. कोणत्याही स्थितीत मुक्ताईनगर गटातून खडसे उमेदवार असणारच यावर खडसे कुटुंबीय ठाम आहेत. खडसे यांच्या या राजकीय धोरणाने जिल्हा बँकेत पुन्हा एकदा खडसे विरुद्ध महाजन असे राजकीय शीतयुद्ध रंगले आहे. त्याकडे सगळ्यांचेच लक्ष आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.