Satish Patil: जळगाव बँकेच्या निवडणुकीतून माजी मंत्री सतीश पाटलांची ऐनवेळी माघार: गुलाबराव देवकर, संजय पवारांवर दगाबाजीचा आरोप

Jalgaon News: जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. माजी मंत्री सतीश पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर पक्षातीलच नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
Satish Patil Sanjay Pawar Gulabrao Deokar
Satish Patil Sanjay Pawar Gulabrao Deokar Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Jalgaon News: जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. माजी मंत्री सतीश पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर पक्षातीलच नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. विरोधकांकडून नव्हे तर आपल्याच पक्षातील नेत्यांकडून विश्वास घात झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे‌‌.

सतीश पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणावर विश्‍वास ठेवावा तेच कळत नाही. माजी मंत्री गुलाबराव देवकर, संजय पवार हे राष्ट्रवादी पक्ष स्वत:च्या घरचा समजतात. स्वत:च्याच घरात बँकेचे संचालक पद कसे राहील याची त्यांनी दक्षता घेत, त्यांच्याच घरात उमेदवारी ठेवली आहे. माझा सहकारातील वीस वर्षांचा अनुभव आहे. त्याचा जराही विचार केला गेला नाही. माझ्यावर या दोघांनी अन्याय केला आहे, माझा घात केल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री सतीश पाटील यांनी केला. माघारीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

डॉ. सतीश पाटील यांनी इतर मागासवर्गीय प्रतिनिधी मतदारसंघातून जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. ते म्हणाले, मला कालपर्यंत सांगण्यात आले की तुमची उमेदवारी पक्की आहे. मात्र, प्रक्रियेत शेवटपर्यंत ठोस निर्णय कळवण्यात आला नाही. शेवटपर्यंत मला झुलवत ठेवले. पक्षातीलच काही नेत्यांनी माझ्याकडे दुर्लक्ष करत चोपड्याच्या जागेला महत्त्व दिलं.

मंगळवारी (ता.17 नोव्हेंबर) दुपारी पावणे तीनला मला सांगण्यात आले की तुम्ही माघार घ्या. मी एकटा पडल्याने मला माघार घ्यावी लागली. पक्षात कोणावर विश्वास ठेवावा अशी स्थिती आहे. सतीश पाटील आपल्याला जड जात असल्याच्या भावनेतून माझा घात करून तिकीट कापल्याचा आरोप त्यांनी गुलाबराव देवकर, संजय पवार यांच्यावर केला.

Satish Patil Sanjay Pawar Gulabrao Deokar
Pune News: ...अखेर महापालिका प्रशासनानं फर्ग्युसन रस्त्यावरील अतिक्रमणांवर चालवला बुलडोझर, सत्ताधारी भाजप नगरसेवकांना करावं लागलं आंदोलन

दरम्यान, गुलाबराव देवकर यांनी सतीश पाटील यांचा आरोप फेटाळले आहेत. पाटील यांनी जबाबदारीने बोलावे असे त्यांनी म्हटले आहे. जो काही निर्णय झाला तो महायुतीने घेतला. त्यामुळे तो स्वीकारावा लागेल.

काल रेस्ट हाउसला महायुतीची बैठक होती. आमदार अनिल पाटील देखील बैठकीला उपस्थित होते. मी होतो, संजय पवार देखील होते. महायुतीत भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी आम्हाला सांगितले की, राष्ट्रवादीचा जिल्ह्यात एकच आमदार आहे. आमचे अधिक आमदार, खासदार आहेत. त्यामुळे तुम्हाला आमदाराच्या प्रमाणात जागा देऊ. आम्ही त्यांना सांगितले, की चार जागा आम्हाला हव्यात. बैठकीत रात्री मंत्री महाजन यांना हस्तांदोलन करून माझी जागा पक्की ठेवा असे सांगून सतीश पाटील निघून गेले.

Satish Patil Sanjay Pawar Gulabrao Deokar
School Admission Rules : पालकांसाठी मोठी बातमी! नर्सरी, केजी आणि पहिलीच्या प्रवेशासाठी मुलाखत, परीक्षांना बंदी; शिक्षण विभागाचे नवे आदेश

रात्री उशिरापर्यत आम्ही महाजनांकडे ओबीसी जागा आम्हाला मिळायला पाहिजे असा आग्रह धरला होता. मात्र, ती जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आली नाही. तीनच जागा राष्ट्रवादीच्या वाटेला आल्या. त्यामुळे सतीश पाटील यांनी आरोप करणे चुकीचे आहे, असा दावाही गुलाबराव देवकरांनी यावेळी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.