Jalgaon Mayor : जळगावात महापौर पदाच्या खूर्चीवर महिलाच बसणार, 'या' दोघींपैकी एक नाव जवळपास फिक्सच होणार

Jalgaon Municipal Corporation mayor : जळगाव महापालिकेत सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष भाजपच ठरला आहे. भाजप मोठा भाऊ ठरल्याने महापौर भाजपचाच होणार हे फिक्स आहे. या दोन महिला नगरसेविकांचे नाव त्यात आघाडीवर आहे.
Jalgaon Municiple Corporation
Jalgaon Municiple Corporation Sarkarnama
Published on
Updated on

Jalgaon Politics : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या महापौर पदासाठी आज आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. या सोडतीत महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये महिला राज पाहायला मिळालं. जळगाव महापालिकेत यंदा महापौर पद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव निघाले असून, महापालिकेत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजपमधील ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेल्या दोन जणींमध्येच आता मुख्य स्पर्धा आहे.

भाजपने जळगाव महापालिका निवडणुकीत ४६ जागा लढविल्या होत्या. त्यापैकी ६ बिनविरोध होऊन उर्वरित ४० जागांवर भाजपने बाजी मारत शंभर टक्के स्ट्राईक रेट राखला. त्यामुळे साहजिकच ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेली भाजपची महिला नगसेवक महापौर पदाच्या खूर्चीवर विराजमान होणार आहे. महापौर पदासाठी दीपमाला काळे आणि उज्वला बेंडाळे यांची नावे चर्चेत असून दोघींपैकी एक हमखास महापौर होईल असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

दीपमाला काळे, उज्वला बेंडाळे यांच्यासह ओबीसी महिला राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या विद्या सोनवणे, माधुरी बारी, वैशाली पाटील, रंजना वानखेडे, वंदना इंगळे आणि गायत्री राणे यांचेही नाव रेसमध्ये आहे. परंतु दीपमाला काळे किंवा उज्वला बेंडाळे या दोघींपैकी एक नाव फिक्स होईल असे म्हटले जात आहे. दीपमाला काळे आणि उज्वला बेंडाळे या दोघीही चौथ्यांदा नगरसेवक झाले असल्याने निष्ठावंत म्हणून त्यांच्यापैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे.

Jalgaon Municiple Corporation
Nashik Mayor : ठरलं ! नाशिक महापौर पदाची माळ महिलेच्या गळ्यात पडणार, ही १० नावे रेसमध्ये

प्रभाग १२ ब मधून उज्ज्वला बेंडाळे व प्रभाग ७ अ मधून दीपमाला काळे या दोन नगरसेविका बिनविरोध निवड आल्या होत्या. याशिवाय प्रभाग ४ ब मधून विद्या सोनवणे, प्रभाग ८ अ मधून कविता पाटील, प्रभाग १० ब मधून माधुरी बारी या नगरसेविका देखील निवडून आल्या आहेत. पैकी उज्ज्वला बेंडाळे आणि दीपमाला काळे या दोघी यंदा तिसऱ्यांदा बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे दोघींमध्येच महापौर पदासाठी मुख्य चुरस असणार आहे.

वैशाली पाटील या पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. त्या बिनविरोध विजयी झाल्या. भाजपचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांचे कट्टर समर्थक अमित पाटील यांच्या त्या पत्नी असल्याने त्यांनाही संधी मिळू शकते अशी चर्चा आहे. तसेच खुल्या प्रवर्गातून विजयी झालेल्या रंजना वानखेडे, वंदना इंगळे आणि गायत्री राणे या तिघांकडे ओबीसी प्रवर्गाचे जात पडताळणी प्रमाणपत्र असेल तर त्यांचाही विचार होईल अशी चर्चा आहे.

महायुतीत भाजप मोठा भाऊ ठरल्याने महापौर भाजपचाच होणार, हे निश्‍चित झाले आहे. दरम्यान शिवसेनेने २३ पैकी २२ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आधीच आपला पक्ष उपमहापौर पदावर दावा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे भाजपचा महापौर व शिवसेनेचा उपमहापौर असे गणित जळगावात दिसू शकते.

Jalgaon Municiple Corporation
Girish Mahajan : विरोधी पक्षातील दहा नगरसेवक भाजपच्या संपर्कात, गिरीश महाजनांच्या दाव्याने नाशिकमध्ये खळबळ

सर्वाधिक जागा भाजपलाच

दरम्यान जळगावात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाट्याला आलेल्या ५ पैकी केवळ प्रफुल्ल देवकरांची जागा जिंकता आली. शिवसेना (उबाठा)ला ५ जागांवर विजय मिळाला, तर प्रभाग क्रमांक १ मधून एकमेव अपक्ष निवडून आला. त्यामुळे जळगाव महापालिकेत सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष भाजपच ठरला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com