Girish Mahajan : भाजपवर कुरघोडी करणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेला सत्तेत सहभागी करणार का? गिरीश महाजन स्पष्टच बोलले...

Nashik Municipal Corporation 2026 : राज्यात महायुतीचे सरकार आहे. यामध्ये शिवसेना घटक पक्ष आहे. या पक्षाने महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाशी युती करून निवडणूक लढवली होती. या आघाडीला 30 जागा मिळाल्या आहेत.
Girish Mahajan, Eknath Shinde
Girish Mahajan, Eknath ShindeSarkarnama
Published on: 
Updated on: 

Nashik News, 23 Jan : नाशिक महापालिकेत भाजप स्वबळावर सत्तेत आला आहे. आता या पक्षात महापौर कोण यावर लॉबिंग सुरू झाली आहे. अशातच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सत्तेत सहभागी केले जाणार का? यावर खल सुरू आहे.

नाशिक महापालिकेत भाजपला स्वबळावर 72 जागा मिळाल्या. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे महापालिकेची सर्व सूत्रे सोपविण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपकडे अनेक इच्छुक तयार झाले आहेत.

राज्यात महायुतीचे सरकार आहे. यामध्ये शिवसेना घटक पक्ष आहे. या पक्षाने महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाशी युती करून निवडणूक लढवली होती. या आघाडीला 30 जागा मिळाल्या आहेत.

Girish Mahajan, Eknath Shinde
Mayor Election : भाजप हतबल! एकनाथ शिंदेंना नशिबाची साथ, महापौर फिक्स! मनसेची लाॅटरी लागणार?

या पार्श्वभूमीवर राज्यातील अन्य महापालिकेचे सत्तेचे गणित विचारात घेता नाशिकमध्ये भाजप काय धोरण राबवतो याची उत्सुकता लागली आहे. शिंदेंच्या शिवसेनेला सत्तेत सहभागी केले जाणार का? याची अनेकांना उत्सुकता आहे. शिवसेनेला सहभागी केल्यास भाजपच्या अनेक इच्छुकांवर अन्याय होण्याची चिन्हे आहेत.

यासंदर्भात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्टच सांगितले आहे. शिवसेनेला सत्तेत सहभागी करायचे अथवा नाही, यावर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. मात्र याबाबतचा निर्णय त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवला आहे.

Girish Mahajan, Eknath Shinde
Balasaheb Thackeray Jayanti : 'तेव्हा ते हिंदुत्वाच्या नावाखाली चाचपडत होते'; बाळासाहेबांच्या 100 व्या जयंतीनिमित्त ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपला करून दिली 'ती' आठवण!

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत पदाधिकाऱ्यांना महत्त्व आहे. या दृष्टीने शिवसेना सत्तेत सहभागी होण्यासाठी जोर लावत आहे. या संदर्भात भाजपची दुहेरी कोंडी होण्याची शक्यता आहे. राज्यातील 16 महापालिकांमध्ये महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत संख्याबळाचा पेच आहे.

शिवसेना यासंदर्भात भाजपवर कुरघोडी करताना दिसतो. कल्याण डोंबिवली येथे भाजपला बाजूला सारून शिवसेनेने मनसेशी समझोता केला आहे. त्यामुळे या राजकीय कुरघोड्या अन्यत्रही पाहायला मिळणार आहेत. त्यात जलसंपदा मंत्री महाजन नाशिकच्या सत्तेत तरी शिवसेनेला वाटेकरी करण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.