JDCC Bank Election : भाजपचा एका जागेवरून थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत जाण्याचा प्लॅन ; दिग्गजांना उतरवणार मैदानात

Jalgaon DCC Bank Election BJP Strategy : गेल्या निवडणुकीत भाजपची केवळ एकच जागा निवडून आली होती. मात्र, यावेळी भाजपने जिल्हा बॅंकेत सत्ता काबीज करण्याची रणनिती आखली आहे.
Jalgaon DCC Bank Election, जळगाव जिल्हा बॅंक निवडणूक
Jalgaon DCC Bank Election Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Jalgaon DCC Bank Election BJP Strategy : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक जाहीर झाली असून इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज खरेदी केले जात आहे. पहिल्याच दिवशी ९४ जणांनी एकुण ३१४ उमेदवारी अर्ज खरेदी केले आहेत.

मागील पंचवार्षिक निवडणुकीत केवळ एक जागा जिंकणाऱ्या भाजपने यंदा थेट पूर्ण बहुमताने सत्ता काबीज करण्याची रणनीती आखली आहे. भाजपकडून जिल्हा बॅंकेच्या आखाड्यात मंत्री, आमदारांसह अनेक दिग्गजांना उतवण्यात येणार आहे. पहिल्याच दिवशी भाजपचे मंत्री संजय सावकारे, त्यांच्या पत्नी रजनी सावकारे, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या नावाने अर्ज खरेदी करण्यात आले आहेत.

एकीकडे निवडणुकीची घोषणा झाली आहे. इच्छुकांकडून अर्ज खरेदी केले जात असले तरी दुसरीकडे अद्याप सर्वपक्षीय पॅनल की महायुती व महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार हे ठरलेलं नाही.

सर्वपक्षीय पॅनल तयार करण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत. या पर्यायाला महाविकास आघाडीनेही तयारी दर्शवली आहे. असे असले तरी, मागील वेळी केवळ एक जागा असलेल्या आणि आता पक्षांतरानंतर महायुतीकडे जास्त संख्याबळ असल्यामुळे भाजपने पूर्ण बहुमताने सत्ता काबीज करण्याची रणनीती आखली आहे.

Jalgaon DCC Bank Election, जळगाव जिल्हा बॅंक निवडणूक
Eknath Shinde : फायनान्स कंपन्यांना उपमुख्यमंत्री शिंदेंचा शेवटचा इशारा, 'कर्जासाठी तगादा लावला, तर खडी फोडायला जाल'

दुसरीकडे, मागील पंचवार्षिक निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीने १० जागा जिंकून एकहाती वर्चस्व मिळवलं होतं. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन गटांत विभागला गेला आहे. त्यातून झालेल्या पक्षांतरामुळे बलाबल बदलले आहे. अजित पवार गटाकडे ६ संचालक तर ४ संचालक शरद पवार गटाकडे आहे.

पहिल्या टप्प्यात राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी चेअरमनपद भूषवलं होतं. परंतु, जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीदरम्यान विद्यमान चेअरमन संजय पवार यांनी बंडखोरी करत भाजपशी हातमिळवणी केली. संजय पवार भाजपच्याच पॅनलमधून निवडून आले.

त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यावर संजय पवार यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत त्यांनी प्रवेश केला.

Jalgaon DCC Bank Election, जळगाव जिल्हा बॅंक निवडणूक
Nashik Kumbh Mela : सिंहस्थाच्या आखाड्यात एकनाथ शिंदेंची एण्ट्री; १३ आखाड्यांतील साधू-महंतांच्या भोजनाची जबाबदारी घेतली

जिल्हा बँकेत सत्तांतर घडवून आणण्यासाठी पवार यांनी शरद पवार गटाच्या दोन संचालकांच्या मदतीने तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यावेळी अजित पवार यांनी स्थानिक पातळीवरच निर्णय घेण्याचे अधिकार दिले होते. त्यानंतर संजय पवार यांनी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या मदतीने थेट चेअरमनपद मिळवलं. यामुळे सत्ता बदलली तरी पूर्ण पाच वर्षे राष्ट्रवादीच्याच नेत्यांकडे चेअरमनपद राहिलं. यंदा भाजप खूर्चीवर आपला चेअरमन बसवण्याची तयारी करत असून त्यादृष्टीने मोर्चेबांधणी सुरु आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com