JDCC Bank Election : जागावाटपाआधीच जळगाव जिल्हा बँकेत मोठा ट्विस्ट ! महायुतीच्या तीन जागा बिनविरोध

Mahayuti Three Seats Unopposed in Jalgaon DCC Bank Election : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महायुतीच्या तीन जागा बिनविरोध झाल्या.
JDCC Bank Election, जळगाव जिल्हा बॅंक
JDCC Bank Election, जळगाव जिल्हा बॅंक Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Jalgaon DCC Bank Election : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. महायुतीमधील जागावाटपाचा तिढा कायम असताना शिंदे शिवसेनेच्या दोन तर भाजपची एक जागा बिनविरोध निश्चित झाली आहे.

पारोळा, एरंडोल, आणि भुसावळ या तीन विकास सेवा संस्था मतदारसंघात अन्य कोणत्याही उमेदवाराने अर्ज दाखल न केल्याने शिवसेनेच्या दोन, तर भाजपची एक जागा बिनविरोध निवडून आली.

शिवसेनेचे आमदार अमोल पाटील यांच्या मातोश्री आणि पत्नी बिनविरोध निवडून आल्या आहेत. पारोळा सोसायटी मतदारसंघातून नलिनी चिमणराव पाटील, तर एरंडोल सोसायटी मतदारसंघातून मृणाल अमोल पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. दोन्ही ठिकाणी विरोधकांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे पारोळा व एरंडोल दोन्ही ठिकाणी पाटील घराण्याचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. या दोन्ही जागांवरील निवडीची राजकीय वर्तुळात विशेष चर्चा सुरू झाली आहे.

दुसरीकडे, भुसावळ सोसायटी मतदारसंघातून भाजपचे मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत तीन महत्त्वाच्या जागांवर राजकीय नेत्यांच्या कुटुंबातील महिलांची वर्णी लागली आहे.

JDCC Bank Election, जळगाव जिल्हा बॅंक
Nashik Kumbh Mela : राष्ट्रपतींच्या दौऱ्याआधी रामकुंड परिसराचे चित्र बदलले! भिकारी शेल्टर होममध्ये, मोकाट श्वानांची धरपकड

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात जागावाटपावरून अद्याप चर्चा सुरू आहे. मात्र, जागावाटपाचा अंतिम निर्णय होण्यापूर्वीच आमदार अमोल पाटील यांनी भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्यामाध्यमातून फिल्डिंग लावत आपल्या दोन जागा बिनविरोध करून घेतल्याची चर्चा जिल्हा बॅंकेच्या राजकीय वर्तुळात आहे.

तर मैत्रीपूर्ण लढत

दरम्यान, भाजपची राष्ट्रवादीसोबत सकारात्मक चर्चा झाली असली तरी शिवसेनेसोबत रस्सीखेच सुरु आहे. भाजप- शिवसेनेमधील जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. तोडगा न निघाल्यास मैत्रीपूर्ण लढत होईल असे संकेत आमदार मंगेश चव्हाण यांनी दिले आहेत.

JDCC Bank Election, जळगाव जिल्हा बॅंक
JDCC Bank Election : जळगाव जिल्हा बॅंक निवडणूक : मंत्री गिरीश महाजनांसह पालकमंत्री गुलाबराव पाटील उतरणार आखाड्यात?

तिघे मंत्री मैदानात

मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री रक्षा खडसे तिघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. महायुतीचे हे तिघे मंत्री निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने निवडणुकीची रंगत वाढली.

दुसरीकडे सलग १० वर्षे संचालक पद भूषवलेल्या व्यक्तींच्या अपात्रतेसंदर्भात नियमामुळे जेष्ठ नेते एकनाथ खडसे, रोहिणी खडसे, गुलाबराव देवकर यांच्यासह ९ संचालक निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.