Jalgaon District Bank Recruitment : जळगाव जिल्हा बँकेचा वादग्रस्त निर्णय ; कला शाखेच्या हजारो विद्यार्थ्यांचा संताप उसळला

Jalgaon District Bank Recruitment : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 125 लिपिकांच्या कंत्राटी भरतीची जाहिरात काढली आहे. मात्र, त्यावरुन कला शाखेच्या विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
Jalgaon District Bank Recruitment
Jalgaon District Bank Recruitment Sarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 125 लिपिक पदांच्या कंत्राटी भरतीची जाहिरात काढली आहे. परंतु बॅंकेने यात कला शाखेचे (बीए, एमए) पदवीधर आणि पदव्युत्तर उमेदवार वगळण्याचा निर्णय घेतला आहे. यातून बॅंकेकडून स्पष्टपणे कला शाखेच्या पदवीधरांना अर्ज करण्यास मनाई करण्यात आली आहे. बॅंकेच्या या निर्णयामुळे अनेक पात्र उमेदवारांना त्यांच्या कला शाखेतील पदवीमुळे अर्ज करता येणार नाही. आता यावरुन वादाची नवी ठिणगी पेटली आहे.

राज्यात आधीच मोठी बेरोजगारी आहे. त्यात जिल्हा बॅंकेच्या या निर्णयामुळे कला शाखेच्या विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. यामुळे हजारो बीए, एमए पदवीधर उमेदवारांमध्ये नाराजी पसरली असून, त्यांची रोजगाराची संधी हिरावली गेली आहे.

कला शाखा ही एक महत्वाची व मोठी शाखा असून, दरवर्षी लाखो विद्यार्थी कला शाखेत प्रवेश घेत असतात. त्यामुळे बीए आणि एमएची पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यांना सरकारी आणि निमसरकारी नोकऱ्यांमध्ये अनेकदा संधी मिळत नाही. त्यातच, आता थेट भरती प्रक्रियेतूनच त्यांना वगळल्यामुळे नाराजी पसरली आहे.

Jalgaon District Bank Recruitment
Nashik News : त्र्यंबकेश्वरनंतर नाशिकचा नंबर ; साधू-महंतांनी जोरदार आग्रह करत केली खास मागणी

दरम्यान या संदर्भात अद्याप बँकेने कोणताही खुलासा केलेला नसल्याची माहिती आहे. यासंदर्भात बँकेचे चेअरमन संजय पवार व कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांच्याशी संपर्क साधला, मात्र तो होऊ शकला नाही. त्यामुळे लिपिक पदासाठी आवश्यक सर्वसाधारण शैक्षणिक पात्रतेमध्ये कला शाखेच्या पदवीधरांना वगळण्यामागे नेमके कोणते कारण आहे हे कळू शकलेलं नाही. (jalgaon News)

Jalgaon District Bank Recruitment
MHADA Nashik lottery : नाशिकमध्ये म्हाडाची 478 घरे! अर्ज नोंदणी 3 ऑक्टोबरपर्यंत, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया..

बँकेच्या जाहिरातीनुसार, कला शाखेचे (B.A. M.A.) पदवीधर व पदव्युत्तर उमेदवार सोडून, उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे अनिवार्य असून परीक्षेत किमान ५० टक्के गुण मिळविणे अनिवार्य आहे. तसेच, एम.एस.सी.आय.टी. परीक्षा उत्तीर्ण असणेही आवश्यक आहे. संगणक शाखेचा पदवीधर किंवा जी.डी.सी. अँड ए. परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2025 आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com