MHADA Nashik lottery : नाशिकमध्ये म्हाडाची 478 घरे! अर्ज नोंदणी 3 ऑक्टोबरपर्यंत, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया..

Nashik MHADA lottery 2025 : नाशिककरांसाठी ही महत्वाची व आनंदाची बातमी आहे. नाशिकमध्ये बेस्ट लोकेशनवर 15 लाखांपासून हक्काचे घर तुम्हाला मिळणार आहे.
MHADA
MHADASarkarnama
Published on
Updated on

Nashik News : नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत नाशिक शहर परिसरातील विविध गृहप्रकल्पांतर्गत 478 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडतीची ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. गंगापूर, देवळाली, पाथर्डी, म्हसरूळ आणि आगरटाकळी शिवार येथील 478 घरांची सोडत पार पडली. ही सोडत म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी मुंबईतील वांद्रे (पूर्व) येथील मुख्यालयातून 'गो-लाईव्ह' कार्यक्रमांतर्गत थेट प्रसारण प्रणालीद्वारे केली.

या वेळी मंडळाचे मुख्य अधिकारी शिवकुमार आवळकंठे, मुख्य अभियंता धोरजकुमार पंदिरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखडे यांसह इतर मान्यवर उपस्थित होते. 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत ही सोडत आयोजित करण्यात आली असून या सोडतीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आणि पारदर्शक असेल, अशी माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिली आहे. कोणत्याही मध्यस्थाच्या मदतीशिवाय नागरिकांनी थेट म्हाडाच्या अधिकृत वेबसाइट किंवा ॲपवरून अर्ज करण्याचे आवाहन जयस्वाल यांनी केले आहे. म्हाडाच्या घरांच्या वितरणासाठी कोणताही प्रतिनिधी, सल्लागार किंवा एजंटची नेमणूक करण्यात आलेली नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं.

कुठे कराल अर्ज व भरणा ?

संगणकीय सोडतीकरिता ऑनलाइन अर्ज नोंदणी व भरणा प्रक्रिया म्हाडा लॉटरी अॅप तसेच https://housing. mhada.gov.in सुरु आहे. अर्ज नोंदणीची अंतिम मुदत 3 ऑक्टोबर रात्री 11.59 वाजेपर्यंत आहे. अनामत रकमेचा भरणा ४ ऑक्टोबर रोजी संबंधित बँकच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS किंवा NEFT द्वारे करता येईल. स्वीकृत अर्जाची अंतिम यादी 17 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता म्हाडाच्या संकेतस्थळावर जाहीर होणार आहे. (MHADA )

MHADA
Nashik Ganesh Visarjan: पोलीस आयुक्तांची शिस्तीची सक्ती, मध्यरात्री बाराच्या ठोक्याला थांबला डीजेचा दणदणाट!

या सोडतीत सर्वसमावेशक योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटासाठी (EWS) सदनिका उपलब्ध आहेत. त्यापैकी देवळाली शिवार (२२) सदनिका), गंगापूर शिवार (५० सदनिका), पाथर्डी शिवार (६४ सदनिका), म्हसरुळ शिवार (१९६ सदनिका), आगर टाकळी शिवार (१३२ सदनिका), नाशिक शिवार (१४ सदनिका) उपलब्ध आहेत.

MHADA
Nashik News : त्र्यंबकेश्वरनंतर नाशिकचा नंबर ; साधू-महंतांनी जोरदार आग्रह करत केली खास मागणी

15 लाखांत हक्काचे घर

नाशिक मंडळाची ही या वर्षातील तिसरी सोडत आहे. यापूर्वी 379 सदनिका, 105 दुकाने आणि 32 भूखंडांचे यशस्वी वितरण मंडळाने केले आहे. ही घरे 15.51 लाख ते 27.10 लाख रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com