Jalgaon Politics : जळगावात जिल्हा बँकेच्या निवडणुकीची धामधूम; 2 हजार 450 ठराव दाखल, 9 दिग्गज पुन्हा रिंगणात उतरण्याची शक्यता

Jalgaon District Bank Election : जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या हालचालींना वेग आला असून प्रस्थापित नेत्यांच्या कुटुंबियांच्या नावाने ठराव दाखल झाले आहेत.
Jalgaon District Bank Election
Jalgaon District Bank ElectionSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon District Bank Election : जळगाव मध्ये सध्या जिल्हा बॅंकेंच्या निवडणुकीची धामधूम सुरु झाली आहे. प्रस्थापित नेत्यांच्या कुटुंबियांच्या नावाने ठराव दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकूण दोन हजार ४५० ठराव दाखल झाले आहेत. २ सप्टेंबरला ठराव पाठविण्याची अंतिम मुदत होती. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने विविध सहकारी सोसायट्यांसह इतर सहकारी सोसायट्यांकडून ठराव मागविले होते.

ठराव पाठवण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत विकास व शेती सहकारी संस्थांचे ८७६ आणि इतर सर्व सहकारी संस्था (दुग्ध संस्थासह) एक हजार ५७४ असे एकूण दोन हजार ४५० ठराव जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला प्राप्त झाले. प्राप्त झालेले ठराव नाशिक सहनिबंधकाकडे पाठविले आहेत.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहकार क्षेत्रातील हालचालींना वेग आला असून प्रारूप मतदार याद्या तयार करण्याचे काम नाशिक सहनिबंधकांकडे अंतिम टप्प्यात असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने दिली. लवकरच मतदार यादी जाहीर होऊन त्यावर हरकती व अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे.

Jalgaon District Bank Election
Jalgaon Election : 15 उमेदवारांना अचानक दणका; तीन वर्षे निवडणूक लढवण्यावर बंदी, विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांचे आदेश

मागील पंचवार्षिक निवडणूक २१ नोव्हेंबर २०२१ ला झाली होती. त्यामुळे यंदाही जळगाव जिल्हा बँकेची अधिकृत निवडणूक नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. ठरावांची छाननी झाली. मतदारयाद्या तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मतदानाची तारीखही ठरविली जाईल. निवडणुकीचे निश्चित वेळापत्रक स्पष्ट होईल. बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर सध्या बँकेच्या २३७ शाखा आणि १२ लाखांहून अधिक ग्राहक आहेत.

Jalgaon District Bank Election
Jalgaon Politics : रक्षा खडसेंच्या तीन ठरावांवर आमदार चंद्रकांत पाटलांचा आक्षेप ; जिल्हा बँकेच्या निवडणुकीआधी वाद पेटला

दरम्यान संभाव्य उमेदवार, गटबाजी आणि पॅनलच्या जुळवाजुळवीला सुरुवात झाली आहे. विद्यमान अध्यक्ष संजय पवारांसह संचालक एकनाथ खडसे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार चिमणराव पाटील यांच्यासह नऊ संचालकांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उभे राहण्याची संधी मिळणार असून ते रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com