JDCC Bank Election : जळगाव जिल्हा बँकेच्या आखाड्यात उतरण्यासाठी आजपासून अर्ज, निवडणूक दुरंगी होण्याची चिन्हे

JDCC Bank Election 2026 latest news : निवडणूक आचारसंहिता लागू झाली असून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. महाविकास आघाडीने पॅनल उभे करण्याचे ठरविल्याने निवडणूक दुरंगी होऊ शकते.
JDCC Bank Election, जळगाव जिल्हा बॅंक
JDCC Bank Election, जळगाव जिल्हा बॅंक Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Jalgaon DCC Bank Election : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. आज (दि. २६) पासून आचारसंहिता लागू झाली आहे. जाहीर करण्यात आलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार २६ ते ३० ऑक्टोबरदरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.

जिल्हा बँकेत उमेदवारी अर्ज विक्री व दाखल करण्याची प्रक्रिया होणार आहे. ३० ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असेल. त्यानंतर उमेदवारी अर्जांची २ नोव्हेंबरला छाननी होणार आहे. ३ नोव्हेंबरला उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ३ ते १७ नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. १८ नोव्हेंबरला सकाळी अकराला उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करून चिन्हवाटप होईल.

२९ नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर, ३० नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल लागेल. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून धुळे जिल्ह्याचे उपनिबंधक मनोज चौधरी आहेत.

नाशिकच्या सहनिबंधकांनी गेल्या १४ ऑक्टोबरला बँकेच्या २,५७१ मतदारांची यादी जाहीर केली होती. सध्या बँकेच्या २३७ शाखा व १२ लाखांहून अधिक ग्राहक आहेत. प्राथमिक विविध कार्यकारी संस्था, दूध संस्था, मालविक्री प्रक्रिया सहकारी संस्था, अर्बन सहकारी संस्था, गृहनिर्माण सहकारी संस्था, पगारदार सहकारी आदी संस्थांचे सभासद मतदार आहेत.

JDCC Bank Election, जळगाव जिल्हा बॅंक
Jalgaon Crime : मंत्री महाजनांच्या जिल्ह्यात RSS च्या पथसंचलनाला विरोध, दगडफेकीत पोलिस जखमी... १५ जणांना अटक

निवडणूक दुरंगी होण्याची चिन्हे

महायुतीकडून ही निवडणूक बिनविरोध करण्यावर खल सुरू आहे. परंतु महाविकास आघाडीने पॅनल उभे करण्याचे ठरविल्याने निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे ही निवडणूक दुरंगी होण्याची चिन्हे आहेत.

महायुतीतर्फे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील इच्छुकांनी नेत्यांकडे लॉबिंग सुरु केली आहे. तिन्ही पक्षांना समान जागा देत महायुतीचे सर्व उमेदवार कसे निवडून येतील, यासाठी रणनीती आखली जात आहे. इच्छुकांनी त्या-त्या विविध कार्यकारी सोसायटीसह मतदारसंघांत आपला जनसंपर्क सुरू केला आहे.

JDCC Bank Election, जळगाव जिल्हा बॅंक
Jalgaon Politics : शिंदे शिवसेनेतील नाराज नेत्याची सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत उडी, घड्याळ हाती बांधताच खदखद बाहेर

दिग्गजांची खेळी

सलग दहा वर्षे संचालक असलेले अपात्र ठरणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे दिग्गजांची अडचणी झाली आहे. अनेक दिग्गज त्यामळे निवडणुकीच्या रिंगणाबाहेर पडले आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाचा आधीच अंदाज आल्याने दिग्गजांनी आपल्या कुटुंबीयांना रिंगणात उतरवण्याची खेळी केली आहे. विद्यमान मातब्बर संचालकांनी अगोदरच कुटुंबीयांतील सदस्यांच्या नावांचे ठराव करून घेतले आहेत. आता या दिग्गजांचे कुटुंबातील सदस्य निवडणुकीच्या आखाड्यात उतरतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com