Jalgaon Gharkul Scam : घरकुल घोटाळा; भाजपच्या दोषी चार माजी नगरसेवकांना निवडणूक बंदी...

Election Ban On Jalgaon Corporator : पाचवे भाजपचे माजी नगरसेवक दत्तू कोळी यांना दिलासा..
Election Ban On Jalgaon Corporator :
Election Ban On Jalgaon Corporator : Sarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News : जळगाव पालिकेच्या घरकुल घोटाळ्यातील गुन्हा सिद्ध झालेल्या माजी चार नगरसेवकांना निवडणूक लढविण्यासाठी सहा वर्षांसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. याबाबतचा आदेश महापालिका आयुक्त विद्या गायकवाड यांनी जारी केला. गुन्हा सिद्ध झालेल्या २०१९ या कालावधीपासून त्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. महापालिका आयुक्तांनी याबाबतचे आदेश २९ नोव्हेंबर २०२३ ला जारी केले. यामध्ये भगत रावलमल बालाणी, सदाशिव गणपत ढेकळे, लताबाई रणजित भोईटे हे तीन निर्वाचित व कैलास नारायण सोनवणे हे स्वीकृत सदस्य आहेत. चारही माजी नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे आहेत. (Latest Marathi News)

Election Ban On Jalgaon Corporator :
Girish Mahajan Vs Khadse : एकनाथ खडसे यांनी हृदयविकार झटक्याचे नाटक केले; गिरीश महाजनांनी डिवचलं!

महापालिका आयुक्तांनी आदेशात विशेष न्यायालय धुळे प्रकरण १/२०१४ (३१ ऑगस्ट २०१९)चा निर्णय, जळगाव न्यायालय निकालपत्र संदर्भ क्रमांक १/२०२१ (१३ एप्रिल २०२३) चा निर्णय व उपसचिव, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्याकडील पत्र क्रमांक रानिआ, मनपा २०२३, स. क्र. ११७, स. क्र. ११७, का. ५ (२९ सप्टेंबर २०२३) चे संदर्भ दिले आहेत. यानुसार न्यायालयाने गुन्हा सिद्ध ठरविलेल्या चार सदस्यांना ३१ ऑगस्ट २०१९ पासून सहा वर्षांसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे.

Election Ban On Jalgaon Corporator :
Raksha Khadse News : 'रावेर' बाबत रक्षा खडसेंचं मोठ विधान; म्हणाल्या, "एकनाथ खडसे हे नाव माझ्या पाठीमागे असल्यानं..."

सभागृहाची मुदत संपली -

महापालिका आयुक्तांच्या या आदेशामुळे महापालिकेचे चारही माजी नगरसेवक सहा वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास अपात्र ठरले असून, त्यांना २०२५ मध्ये निवडणूक लढविता येणार आहे. दरम्यान, महापालिकेच्या नगरसेवकांची पाच वर्षांची मुदत संपली. आता महापालिकेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर महापालिकेच्या निवडणुका होतील.

साधारण ऑक्टोबर २०२४ मध्ये विधानसभा निवडणुका होतील. त्यानंतर २०२५ मध्ये महापालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे. जर महापालिकेची निवडणूक २०२५ पूर्वी झाली, तर या चार माजी नगरसेवकांना निवडणूक लढता येणार नाही. निवडणूक २०२५ मध्ये झाल्यास ती नेमकी कोणत्या महिन्यात होते, त्यावर या चौघांना उमेदवारी करता येईल की नाही, हे स्पष्ट होईल.

Election Ban On Jalgaon Corporator :
Raksha Khadse Lok Sabha Election : 'तर तो माझ्यावर अन्याय'; रक्षा खडसेंच्या भूमिकेमुळे भाजपची अडचण !

माजी नगरसेवकाची याचिका -

शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी पाच नगरसेवकांविरुद्ध २०२० मध्ये जळगाव जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती. जळगाव न्यायालयात सुनावणी होऊन पाचपैकी चार नगरसेवकांच्या अपात्रतेसंबंधी निकाल देण्यात आला. पाचवे भाजपचे माजी नगरसेवक दत्तू कोळी यांना सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेस स्थगिती दिल्याने त्यांना दिलासा मिळाला होता.

याबाबत माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी म्हणाले, "आपण जिल्हा न्यायालयात नगरसेवकांना अपात्र करण्याबाबत याचिका दाखल केली होती. न्यायालयाने आपल्याला न्याय दिला. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी अपात्रतेचा आदेश दिला आहे. त्याबाबत आपण समाधानी आहोत."

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com