BJP Politics : उन्मेष पाटील, रक्षा खडसे यांच्या उमेदवारीचे काय होणार? महायुतीच्या मेळाव्यात मिळणार उत्तर

Politikal News : उमेदवार ठरण्याआधीच जळगावमध्ये महायुतीने फुंकले रणशिंग
BJP Politics : उन्मेष पाटील, रक्षा खडसे यांच्या उमेदवारीचे काय होणार? महायुतीच्या मेळाव्यात मिळणार उत्तर

Jalgaon : महायुतीचे जागावाटप आणि उमेदवार दोन्हीही अद्याप गुलदस्त्यात आहेत. मात्र इलेक्शन मोडवर असलेला भाजप फार आधीच सक्रिय झाला आहे. येत्या रविवारी जळगावमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचे शक्तिप्रदर्शन होणार आहे. या शक्तिप्रदर्शनातून जळगाव जिल्ह्यातील महायुतीचा उमेदवार कोण, याचे संकेत मिळण्याची शक्यता आहे.

रविवारी जळगाव येथे होणाऱ्या या मेळाव्यासाठी भारतीय जनता पक्षासह महायुतीचे घटक शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते आणि मंत्री या मेळाव्यात लोकसभेसाठी रणशिंग फुंकणार आहेत. महायुतीचा हा पहिलाच मेळावा असल्याचे पदाधिकाऱ्यांकडून जोरदार तयारी केली आहे. या मेळाव्यातून जळगावचे खासदार उन्मेष पाटील आणि रावेरच्या रक्षा खडसे या दोन्ही खासदारांना पुन्हा उमेदवारी मिळणार का? तसेच महायुतीचे घटक असलेल्या पक्षांकडून लोकसभेच्या जागेवर सांगितलेला दावा मागे घेतला जाईल, या प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता आहे.

BJP Politics : उन्मेष पाटील, रक्षा खडसे यांच्या उमेदवारीचे काय होणार? महायुतीच्या मेळाव्यात मिळणार उत्तर
Modi Nashik Tour : कांद्याच्या माळा घालून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोदींच्या स्वागताला जाणार

गेल्याच आठवड्यात भाजपचे नेते आणि ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना जळगाव जिल्ह्यातून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार करावे, असे आव्हान दिले होते. त्यानंतर लगेचच खडसे यांनीदेखील महाजन यांनी माझ्याविरोधात उमेदवार म्हणून उभे राहावे, असे प्रतिआव्हान दिले. या राजकीय पार्श्वभूमीवर हा मेळावा होत असल्याने त्याचे स्वरूप महामेळाव्याचे असेल, असा दावा शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील, भाजपचे आमदार मंगेश चव्हाण आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दोन्ही जागांवर दावा...

जिल्ह्यात जळगाव आणि रावेर असे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. दोन्ही लोकसभा मतदारसंघांसाठी महायुती कामाला लागली आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाने सातत्याने संघटनात्मक यंत्रणा कार्यान्वित ठेवण्यासाठी बैठका, मेळावे, युवा वॉरियर्स, कार्यकर्त्यांच्या बैठका आणि विविध राजकीय उपक्रमातून निवडणुकीची जोरदार मोर्चेबांधणी सुरू ठेवली आहे. राज्यात लोकसभेसाठी ४५ प्लस अशी घोषणा केली असल्याने दोन्ही मतदारसंघ भारतीय जनता पक्षाला आपल्या ताब्यात ठेवायचे आहे.

(Edited Rosha More)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com