Modi Nashik Tour : कांद्याच्या माळा घालून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोदींच्या स्वागताला जाणार

NCP aggressive onion issue : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या ओबीसी सेलकडून कांदाप्रश्नावर पंतप्रधान मोदी यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न.
Narendra Modi
Narendra Modi Sarkarnama
Published on
Updated on

Nashik News : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ओबीसी सेलच्या पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिकच्या दौऱ्यात कांद्याच्या माळा घालून त्यांचे स्वागत केले जाईल, असा इशारा दिला आहे. (NCP workers will attend Modi's reception by wearing onion garlands)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यात तोंडदेखल्या रंगरंगोटी आणि साफसफाईवर तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न अतिशय गंभीर आहे. त्याकडे भाजपचे लोकप्रतिनिधी आणि नेते लक्ष द्यायला तयार नाहीत. सरकारचेही संपूर्ण दुर्लक्ष झाले आहे, हे प्रश्न सोडविण्याऐवजी भलतीच कामे होत असल्याने हा दौरा शेतकरी आणि नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे, असे शेतकऱ्यांचे मत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Narendra Modi
Narendra Modi Nashik Tour : नरेंद्र मोदींनी नाशिकमधूनच लोकसभा लढवावी; महंतांची इच्छा पंतप्रधान स्वीकारतील ?

केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी करून नाशिकसह महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे मोठे नुकसान केले आहे. या प्रश्नाकडे सत्ताधारी पक्षाने स्वतः पंतप्रधानांचे लक्ष वेधण्याची गरज आहे, त्याऐवजी विरोधी पक्षांना हे काम करावे लागत आहे. भाजपच्या मंत्र्यांनी कांदा निर्यातबंदीबाबत सरकारला निवेदन दिले होते, त्याचे काय झाले, असा प्रश्न ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष ॲड. सुरेश आव्हाड यांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलची बैठक नुकतीच झाली. यावेळी नाशिकच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली. एकीकडे दुष्काळसदृश्य परिस्थिती असल्याने शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे. पीक विमा कंपन्यांनी कोणतीही भरपाई दिलेली नाही. राज्य सरकारने घोषणा करूनही शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. हे अत्यंत गंभीर प्रश्न असताना त्यातच कांदा आणि द्राक्ष या दोन्ही पिकांचे भवितव्य संकटात आहे. या प्रश्नांवर पंतप्रधानांच्या दौऱ्यात चर्चा का होत नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

Narendra Modi
Santosh Bangar: मोदी पुन्हा पंतप्रधान झाले नाही तर गळफास घेणार; शिंदेंच्या आमदारानं केला पण

नाशिक शहरातील बहुतांशी रस्ते अत्यंत वाईट स्थितीत आहेत. पावसाळ्यात प्रचंड खड्डे पडले आहेत. नागरिकांनी आंदोलन केले. वारंवार मागण्या केल्या तरीही प्रशासनाने ते खड्डे बुजवले नाहीत. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यामुळे तात्पुरती डागडुजी करून देखावा केला. हा दुटप्पीपणा प्रशासन केव्हा थांबवणार, असा प्रश्न करून नाशिककरांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदी यांचे उद्या नाशिकमध्ये कांद्याच्या माळा घालून स्वागत करू, असा इशारा दिला आहे.

Narendra Modi
Shiv Sena MLA Disqualification : नार्वेकरांच्या निकालानंतर ठाण्यात आता फक्त बॅनर बोलणार

पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन अलर्ट मोडवर आहे. कोणत्याही आंदोलनाला प्रशासन परवानगी देणार नाही. मराठा आरक्षण आणि कांदा निर्यातबंदी या प्रश्नावर त्यापूर्वी आंदोलन केलेल्या नेत्यांना पोलिस बुधवारपासून नोटीस बजावत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलला आंदोलन करण्याची परवानगी मिळेल का? याबाबत अनिश्चितता आहे.

Edited By : Vijay Dudhale

R...

Narendra Modi
BJP Politics : भाजपला सत्ता मिळवून देणाऱ्या ‘लाडली बहना’लाच सासुरवास; धक्कादायक माहिती समोर...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com