Jalgaon MLC Election: जळगावसाठी गिरीशभाऊ कॉन्फिडंट; इच्छुकांना आता फक्त निरोपाची प्रतीक्षा!

Girish Mahajan Decide BJP Candidate Jalgaon MLC election : जळगाव विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपमध्ये हालचालींना वेग आला आहे. उमेदवार निश्चित करण्यात मंत्री गिरीश महाजन यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
Girish Mahajan
Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

Girish Mahajan News: विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यमान आमदार भाजपचा असल्याने जळगावची जागा पक्षाकडेच राहील, असा दावा नेते करीत आहेत. त्यामुळे मंत्री गुलाबराव पाटील यांना काय पर्याय दिला जातो, याचीच उत्सुकता आहे.

उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध निवडणुकांमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपविली आहे. जळगावच्या नेत्यांनीही भाजपचा निर्णय मंत्री महाजन हेच घेतील हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे जळगाव बाबत काय निर्णय होतो, हे जवळपास निश्चित मानले जाते.

जळगाव जिल्ह्यात महायुतीचा घटक भाजपचा वरचष्मा आहे. बहुतांशी सत्ता केंद्र भाजपकडेच आहेत. विधान परिषदेच्या संख्याबळाच्या दृष्टीने ही भाजपने प्रभाव कायम ठेवला आहे.

शिवसेना शिंदे पक्षाचे सर्वच आमदार विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. या नेत्यांनी शिवसेना आणि भाजप तुल्यबळ असल्याचा दावा केला आहे. त्या दृष्टीने विधान परिषदेची जागा खेचून आणण्याचा निर्धार मंत्री गुलाबराव पाटील यांचा होता.

Girish Mahajan
Tukaram Mundhe News: पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढेंचा दणका! 3 दिवसांत 53 छापे, 25 FIR, 33 जण तुरुंगात

सध्या मात्र भाजप आत्मविश्वासाने निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे दिसते. भाजपकडेच राहील. पक्षाकडून डॉ केतकी पाटील, नंदू अडवाणी हे इच्छुक उमेदवारी अर्ज तयार करण्यासाठी सज्ज आहेत.

भाजपच्या जळगाव जिल्ह्यातील बहुतांशी नेत्यांनी जागा पक्ष आपल्याकडेच ठेवणार असा विश्वास नगरसेवक आणि मतदारांना दिला आहे. सध्या फक्त इच्छुकांना अर्ज कोणी दाखल करावा, या निरोपाची प्रतीक्षा आहे, असे राजकीय वातावरण आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मंत्री गिरीश भाऊ ठरवतील तो निर्णय अशी जळगावची स्थिती आहे.

Girish Mahajan
Laxman Hake News: मनोज दादा, हाल्याकडून शिंग घुसेल, पण दूध मिळणार नाही! लक्ष्मण हाकेंनी जरांगेंना पुन्हा डिवचलं

शिवसेनाही जळगाव जिल्ह्यात तुल्यबळ आहे. विशेषतः नगरपालिका निवडणुकीत या पक्षाने भाजपला झुंजविले होते. त्यामुळे पक्षाच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जळगावच्या जागेसाठी आग्रह धरला आहे. प्रसंगी मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव देखील नेत्यांकडे देण्यात आला आहे.

या संदर्भात आमदार किशोर पाटील विशेष आग्रही आहेत. मंत्री गुलाबराव पाटील यांनी याबाबत धोरणी भूमिका घेत जाहीर वक्तव्य टाळले आहे. शिवसेनेकडून मंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रताप पाटील उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. वरिष्ठांचे आदेश येतात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची त्यांची तयारी आहे.

या निवडणुकीसाठी जळगाव जिल्ह्यात महायुतीमध्ये सहकारी पक्षांमध्येच जोरदार चुरस आहे. त्यात भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांची भूमिका निर्णायक असेल. अर्ज दाखल करण्याचे शेवटचे तीन दिवस शिल्लक असल्याने काय निर्णय होतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com