BJP internal conflict : फिल्डिंग लावून पत्ता कट, भाजप इच्छुक उमेदवार संतापला; किशोर जोरगेवारांचं दहा वर्षांपूर्वीचं 'फॉर्महाऊस कांड' काढून बसला

Chandrapur Municipal Election: Ajay Sarkar Serious Allegations Against BJP MLA Kishor Jorgewar : चंद्रपूर महापालिका निवडणुकीत माजी नगरसेवक अजय सरकार याने भाजप आमदार किशोर जोरगेवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
BJP MLA Kishor Jorgewar
BJP MLA Kishor JorgewarSarkarnama
Published on
Updated on

Chandrapur Mahanagarpalika Election : चंद्रपूर महापालिकेत उमेदवारीवरून भाजपचे सुधीर मुनगंटीवार समर्थक माजी नगरसेवक अजय सरकार आणि भाजप आमदार किशोर जोरगेवार यांच्यात चांगलीच जुंपली.

आमदार जोरगेवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात विधानसभा निवडणुकीत कॅम्पेन चालवणारे, सभा उधळणारे, असे गंभीर आरोप करत माजी नगरसेवक अजत सरकार यांची भाजपच्या उमेदवारीचा पत्ता कट केला. यावरून संतापलेले अजय सरकार यांनी जोरगेवार यांच्या फार्म हाऊसवर दहा वर्षापूर्वी झालेल्या घटनेचा दाखल देत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

माजी नगरसेवक अजय सरकार यांना भाजपची (BJP) उमेदवार मिळू नये यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी चांगलीच फिल्डिंग लावली. आमदार जोरगेवार यांनी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात कॅम्पेन चालवणाऱ्याला जोरदार विरोध केला. यानंतर अजय सरकार यांचे तिकिट कापण्यात आले.

किशोर जोरगावर (Kishor Jorgewar) यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर अजय सरकार देखील आक्रमक झाले असून, त्यांनी जोरगेवार यांच्यावर थेट हल्ला चढवला. मला गुंड संबोधण्याआधी तुम्ही दहा वर्षांपूर्वी फॉर्म हाऊसवर कसे पकडले गेले आणि 50 लाख रुपये देऊन कसे सुटले, हे मला माहिती आहे, असा गौप्यस्फोट केला. अजय सरकार हे माजी नगरसेवक असून, ते सुधीर मुनगंटीवार यांचे आता समर्थक असल्याचे सांगितले जाते.

BJP MLA Kishor Jorgewar
Bhagwan Fulsundar joins NCP : फुलसौंदरांचा ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'; भाजप-राष्ट्रवादीच्या 12 माजी नगरसेवकांना डिच्चू, बंडखोर शिंदे शिवसेनेच्या गळाला

तसंच तुमचा मुलगा ड्रग्स प्रकरणात सापडल्यावर दहा लाख देऊन त्याला कसे सोडवले, तुमचा मुलगा रात्रीच्या वेळी कोणत्या मुलींना घेऊन जातो, हे सर्व मला माहित आहे, शिवाय माझ्यावर 20 गुन्हे असल्याचे जोरगेवार म्हणाले, पण ते चुकीचे बोलले. माझ्यावर 33 गुन्हे दाखल असून, ते राजकीय स्वरूपाचे आहेत. त्यांची सेवा करीत होतो, तेव्हा गुन्हेगार नव्हतो. आता तिकfट द्यायची वेळ आली, तर गुन्हेगार झालो काय? असा संतप्त सवालही सरकार यांनी केला.

BJP MLA Kishor Jorgewar
Ajit Pawar Politics : अजितदादांनी शेवटच्या क्षणी गेम फिरवला; भाजपच्या बंडखोरांना 'बळ', पुण्यासाठी खास 'रणनीती'

अजय सरकार आणि पूजा पोतराजे या मुनगंटीवार समर्थकांच्या नावांवर हा आक्षेप होता, अजय सरकार यांच्यावर 302 सहित 20 गंभीर गुन्हे दाखल असल्यामुळे त्यांना उमेदवारी का द्यावी? असा जोरगेवार यांचा आक्षेप होता. पूजा पोतराजे यांचे पती मनोज पोतराजे यांनी गेल्या काही दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात समाज माध्यमांवर अतिशय खालच्या भाषेत टीका केली होती, मग त्यांना उमेदवारी का? असा जोरगेवार यांचा सवाल होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com