Maharashtra Politics : बाकी सगळे युतीच्या चक्रात अडकले, तिकडे शिंदेंच्या आमदाराने स्वबळावर पत्नीच्या प्रचाराचा नारळही फोडला..

Kishor Patil : शिवसेना (शिंदे) पक्षाचे आमदार किशोर पाटील यांनी फार आधीच स्वबळाचा नारा दिला होता. आता तर त्यांनी थेट पत्नीला नगरपालिका निवडणुकीच्या आखाड्यात उतरवत प्रचाराचा नारळ सुद्धा फोडला.
Kishor Patil & Girish Mahajan
Kishor Patil & Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon Politics : जळगाव जिल्ह्याचे पाचोरा भडगाव मतदारसंघाचे शिवसेना(शिंदे गटाचे) आमदार किशोर पाटील यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. कोणत्याही परिस्थिती युती होणार नाही. माझ्या मतदारसंघात शिवसेना स्वबळावरच लढणार अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यांच्या पत्नी सुनीता पाटील या पाचोरा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असून, आज त्यांच्या प्रचाराचा नारळ फोडत शुभारंभ करण्यात आला.

शहरातील पहिला माता मंदिरात नारळ फोडून पत्नी सुनिता पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. पाचोऱ्याच्या जनतेचा विश्वास आमच्यावर आहे, आणि आम्हीच विजयी होऊ असा विश्वास किशोर पाटलांनी व्यक्त केला. यावेळी आमदार किशोर पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी किशोर पाटील म्हणाले, विधानसभा निवडणुकीत ज्यांनी आपल्याविरोधात निवडणूक लढवली, जे आपल्या राजकीय कारकिर्दीत सतत विरोधक राहिले, त्यांच्या सोबत युती कशी करू शकतो? म्हणूनच आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याचे पाटील म्हणाले.

Kishor Patil & Girish Mahajan
Sinnar Politics : सिन्नरमध्ये काका विरुद्ध पुतणी सामना टाळण्यासाठी प्रयत्न, कुणाचा पुढाकार?

किशोर पाटलांनी शिवसेना शिंदे गटाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा न करताच सगळ्यात आधी स्वबळावर लढणार असल्याची घोषणा करुन टाकली. राज्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये स्वबळाचा नारा देणारे शिवसेना (शिंदे) पक्षाचे ते पहिले आमदार ठरले आहेत. नुसती घोषणाच नाही तर त्यांना प्रचाराचा शुभारंभही करुन टाकल्याने राजकीय वर्तुळात किशोर पाटलांच्या भूमिकेविषयी जोरदार चर्चा रंगली आहे.

विधानसभेला त्यांच्या मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराने बंडखोरी केली होती. त्यामुळे भाजप नेत्यांवर त्यांचा राग आहे. पाचोऱ्यात झालेल्या निर्धार मेळाव्यात त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता. भाजप नेते आज युती बद्दल बोलत असले तरी ते कधी पलटी खातील याचा भरोसा नाही या शब्दात त्यांनी भाजप नेत्यांवर टीका केली होती. महायुतीच्या एक वर्षाच्या काळात आमदारांना एक फुटकी कवडीही मिळाली नाही असं म्हणत त्यांनी महायुतीलाच घरचा आहेर दिला होता.

Kishor Patil & Girish Mahajan
Nashik Politics : शिक्षणमंत्री दादा भुसेंच्या भूमिकेने मनपा आयुक्त मनिषा खत्रींची कोंडी, विषय थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत नेणार

पाचोरा मतदारसंघात आमदार किशोर पाटील यांचा मोठा प्रभाव आहे. सध्या भाजपचे सर्व नेते त्यांच्या विरोधात एकवटल्याचे चित्र आहे. विशेषत:त्याच्या बहिण वैशाली सूर्यवंशी यांचे व त्यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. वैशाली सूर्यवंशी या आपल्या वहिनीच्या विरोधात प्रचारात उतरणार असल्याने या निवडणुकीला वेगळा रंग असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com