Kishor Patil : शिंदे-फडणवीस भाकरी फिरवणार? आमदार किशोर पाटील म्हणे, "मला मंत्री म्हणून पाहणाऱ्यांच्या तोंडात साखर पडो'

Jalgaon Politics : भाजपचे चक्रव्यूह भेदत आमदार किशोर पाटलांनी नगरपालिका निवडणुकीत चांगली कामगिरी केली होती. त्यातूनच त्यांचे राजकीय वजन वाढल्याची चर्चा जळगावच्या राजकाणात आहे.
Gulabrao Patil , Kishor Patil
Gulabrao Patil, Kishor PatilSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon Politics : जळगाव जिल्ह्यातील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत संभाव्य खांदेपालटाच्या चर्चांना सध्या उधाण आलं आहे. पाचोरा-भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांचे नाव मंत्रिपदासाठी पुढे आल्याने तापमानातील पाऱ्यासोबतच राजकीय वातावरणाचा पारा वाढला आहे. मला मंत्री म्हणून पाहणाऱ्यांच्या तोंडात साखर पडो असे विधान किशोर पाटलांनी केलं आहे.

आमदार किशोर पाटील यांनी पाचोऱ्यातील एका मेळाव्यात उपस्थितांशी बोलताना, "आपल्या सगळ्यांची इच्छा आहे की, आता माझ्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडावी. जशी तुमची इच्छा आहे तशी माझी पण आहे. पण आता ती केव्हा पडते ते माझ्या हातात नाही. आजवर मला न मागता सर्व काही मिळालं. त्यामुळे याही पुढे जे मिळेल ते न मागताच मिळेल याची मला शंभर टक्के खात्री असल्याचं किशोर पाटील म्हणाले"

त्यानंतर आता किशोर पाटलांना मंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चांना अधिकच जोर आला आहे. अशा स्थितीत, जळगावचे पालकमंत्री आणि शिवसेना शिंदे गटातील प्रभावी नेते गुलाबराव पाटील यांच्या मंत्रिपदाबाबतही अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

आमदार किशोर पाटील यांनी आपली इच्छा व्यक्त केल्यानंतर त्यावर माध्यम प्रतिनिंधीनी मंत्री गुलाबराव पाटील यांना यासंदर्भात विचारलं, त्यावर “प्रत्येकाला मंत्री होण्याची इच्छा असते. मात्र अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतात,” अशी सावध प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली. त्यावर गुलाबराव म्हणतात ते बरोबर आहे असं किशोर पाटील म्हणाले.

Gulabrao Patil , Kishor Patil
Jalgaon Police Station Fight : पोलिस ठाणं बनलं अखाडा! भाजप माजी नगरसेवक अन् युवकांचा तुफान राडा

गुलाबराव पाटील म्हणतात त्यात वस्तुस्थिती आहे. जो काय निर्णय घ्यायचा तो शिंदे साहेब व फडणवीस साहेबच घेतील. त्यांनी घेतलेला निर्णय खालच्या सगळ्या सदस्यांना मान्य करायचा असतो. त्याच्यामुळे निश्चितपणे नेते निर्णय घेतील तो भाऊ(गुलाबराव पाटील) मान्य करतील असा त्याचा अर्थ होतो असं आमदार किशोर पाटील म्हणाले.

मात्र स्वत:शिंदे साहेबच बोलले होते की, ज्याच्यात काम करण्याची धमक दिसणार नाही, काम करेल किंवा पक्षाचे काम करणार नाही अशावेळी मी भाकरी फिरवेल असे संकेत त्यांनी दिले होते. असे माध्यमांमधूनच आम्ही ऐकल्याचे किशोर पाटील म्हणाले. ते असं कुणाबद्दल बोलले माहित नाही. पण, एवढं मात्र नक्की आहे की, अडीच वर्षानंतर मंत्रिमंडळात फेरबदल होतील असे स्वत: मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांनी सांगितले होते असं किशोर पाटील म्हणाले.

Gulabrao Patil , Kishor Patil
Jalgaon MC : पक्षाच्या गटनेत्याकडूनच उद्धवसेनेचा गेम, ऐनवेळेला स्वीकृतसाठी भाजप कार्यकर्त्याच्या पत्नीचे नाव केले पुढे

दरम्यान किशोर पाटील यांच्या मंत्रिपदाच्या संभाव्य दावेदारीमुळे शिवसेनेतील दोन्ही पाटलांमधील स्पर्धा आता अधिक उघडपणे समोर येत असल्याचे दिसून येत आहे. कथित संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारातून कोणाला संधी मिळणार आणि कोणाचे मंत्रिपद काढून घेतले जाणार यावर जळगावच्या राजकारणात खमंग चर्चा होत असल्याचे बघायला मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com