Jalgaon Politics : जिल्हाप्रमुख पदावरून काढल्याचा संताप ; एकनाथ शिंदेंचा नेता राजीनामा देऊन थेट पक्षातून बाहेर पडला

Nilesh Patil resigns Shiv Sena : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्या आहेत. अशात जळगाव जिल्ह्यात माजी जिल्हाप्रमुखानेच शिवसेना पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
Gulabrao Patil, Eknath Shinde
Gulabrao Patil, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon Politics : जळगाव जिल्ह्यात शिवसेना (शिंदे)पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे. माजी जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांनी तडकाफडकी पक्षाचा राजीनामा दिला आहे. ते लवकरच नवीन पक्षात प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

विधानसभेच्या निवडणुकीत चांगले काम करूनही अचानक जिल्हाप्रमुखाचे पद काढून घेतल्याने निलेश पाटील हे नाराज झाले होते. विधानसभेच्या निवडणुकीनंतर पाटील यांच्या जागी अचानक विष्णू भंगाळे यांची नियुक्ती झाल्यानंतर वादाची ठिणगी पडली होती. त्याच ठिणगीचा आता स्फोट झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते पक्षापासून दूर-दूरच राहत होते.

निलेश पाटील हे शिवसेनेत आल्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे समर्थक म्हणून ओळखले जाऊ लागले होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून ते पक्षात अस्वस्थ होते. त्यांना जिल्हाप्रमुख पदावरून काढून सहसंपर्क प्रमुख पद देण्यात आले होते. यातच पक्षाच्या कार्यक्रमाला आपल्याला बोलावण्यात येत नसल्याची नाराजी त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवली होती.

Gulabrao Patil, Eknath Shinde
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातले निवडणूक प्रभारी ठरवले ; दमदार खांद्यांवर टाकला भार

निलेश पाटील यांनी शिंदे गटाचे सचिव संजय मोरे यांच्याकडे शिवसेनेच्या सदस्यत्वाचा राजीनामा पाठविला असून ते अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू असताना त्यांनी राजीनामा दिल्याने हा शिवसेना शिंदे गटासाठी मोठा फटका मानला जात आहे.

जळगाव महापालिकेची निवडणूक दीड महिन्यांवर आल्यानंतरही शिवसेना शिंदे गटाकडून कोणतीच हालचाल नाही. मेळाव्यांसह प्रभाग समिती बैठकांचे आयोजन केले जात नसून, पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना कोणीच विश्वासात घेत नसल्याची तक्रार निलेश पाटील यांनी केली आहे.

Gulabrao Patil, Eknath Shinde
BJP Politics : नाशिक जिल्ह्यात भाजपकडून नुसता फोडाफोडीचा धडाका, थेट महाविकास आघाडीच्या उमेदवारांवरच घाव

जळगावात महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजप व शिवसेनेच्या नेत्यांनी युती न झाल्यास स्वबळाची भाषा केली आहे. त्यामुळे सर्वच पक्ष आपआपली ताकद वाढविण्यासाठी एकमेकांच्या नेत्यांना गळाला लावत प्रवेश देत आहेत. त्यातूनच पुढच्या काळात महायुतीमधील तीन्ही पक्षांचे अंतर्गत मतभेद व तणाव अधिक टोकाला जाण्याची चिन्ह दिसू लागली आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com