Baby murder case : धक्कादायक! आईबापाचं निघाले वैरी; तीन महिन्यांच्या शिवांशचा मृतदेह काटेरी झुडुपात फेकला, कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी मारेकरी गाठला

Jalna Couple Kills Three-Month-Old Baby Ahilyanagar Police Investigation : तीन महिन्याच्या बाळाची हत्या करून त्याचा मृतदेह संगमनेरमध्ये इथल्या मुळा नदीत फेकल्याचा गुन्हा अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी उघडकीस आणला.
Baby murder case
Baby murder caseSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar police investigation : तीन महिन्याच्या शिवांशची हत्या करून, त्याचा मृतदेह अहिल्यानगरच्या संगमनेर इथल्या मुळा नदीतील काटेरी झुडपात फेकून दिला. या घटनेचा कोणताही पुरावा नव्हता. परंतु स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी यात तपास करत, धक्कादायक माहिती समोर आणली.

तीन महिन्याच्या शिवांशची हत्या त्याच्याच आईवडिलांनी केल्याचं तपासात निष्पन्न झालं. याप्रकरणी जालना इथले शिवांशचे वडील प्रकाश पंडित जाधव (वय 37), आई कविता (वय 32) आणि हरिदास गणेश राठोड (वय 32, तिघे रा. , ता. भोकरदन, जि. जालना) या तिघांविरोधात हत्या करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी दिली.

संगमनेरच्या (Sangamner) मुळा नदीच्या पुलाखालील काटेरी झुडुपात 4 डिसेंबरला सकाळी सव्वानऊ वाजता, शिवांश या तीन महिन्याचा बाळाचा मृतदेह स्थानिक रहिवासी अशोक माळी यांना आढळला. घारगाव पोलिसांना दिलेल्या माहितीवरून आकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी घटनास्थळाची तसेच बाळाच्या मृतदेहाचा पाहणी केली. यावरून किरणकुमार कबाडी यांना वेगळाच संशय आला, अन् तपासाची चक्र फिरली.

किरणकुमार कबाडी यांनी पोलिस (Police) पथकाची नेमणूक करत, तपासाला दिशा अन् वेग दिला. घटनेचा परिसर अगदी निर्मनुष्य, असा होता. तिथून कोणतं वाहन गेलं, तरी समजणार नाही, अशी स्थिती होती. परंतु, जाणाऱ्या मार्गावर अन् उघडकीस आलेली घटनेचा वेळ, याचा मेळ साधत, किरणकुमार कबाडी यांनी पथकाला तपासाच्या सूचना दिल्या. यातच मार्गावरील एका इमारतीबाहेरून मोठा सुराग मिळाला.

Baby murder case
Ashish Yerekar Dispute: भाजपने पैसे वाटल्याचे पुरावा देतो, जिल्हाधिकारी येरेकरांच्या बघ्याची भूमिका; गुन्हा दाखल होताच 'वंचित'च्या विश्वकर्मांची विभागीय आयुक्तांकडे तक्रार

या मार्गावर एक कार भरधाव वेगात गेली होती. या कारचा शोध घेणे म्हणजे, दिव्यचं होते. परंतु पोलिसांनी वेळेचा मेळ जुळवला, अन् कारचा शोध घेतला. ही कार जालना जिल्ह्यात असल्याचं समोर आले. त्यानुसार पथकाने थेट भोकरदन (जि. जालना) गाठलं. पण तिथं वेगेवगळ्या घटकांकडून माहिती घेत, तर कविता जाधव ही महिलेचं बाळंतपण छत्रपती संभाजीनगर इथं झालं असून, ती रुग्णालयातून थेट नातेवाइकांकडे गेली आहे. पण या माहितीत विसंगती येत होती.

Baby murder case
Rajendra Raut : बार्शी बाजार समितीतील विजयानंतर राऊतांची मोठी घोषणा; ‘ZPच्या सहा अन्‌ पंचायत समितीच्या 12 जागा...’

प्रकाश पंडित जाधव, याची पत्नी कविता आणि हरिदास गणेश राठोड या तिघांना ताब्यात घेत, चौकशी केली. या तिघांकडून विसंगत अन् संशयास्पद माहिती समोर आली. पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेत अहिल्यानगर पोलिस दलाच्या गुन्हे शाखेत आणत. हे तिघं जास्त वेळ पोलिसांसमोर दम धरू शकले नाही. जाधव दाम्पत्यानं हरिदास याच्या कार घेऊन, तीन डिसेंबरला पुणे दिशेनं जात संगमनेर इथं आलो. तिथं संगमनेरमधील एका नदीजवळ कार थांबवून शिवांशचं आजारपण बरं होणार नसल्यानं त्याला तिथं गळा आवळून त्यांना फेकल्याचं सांगितलं.

पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली पाच लाख रुपयांची कार जप्त केली आहे. शिवांश बाळाचा गळा आवळून हत्या केल्याने तसा गुन्ह्याची नोंद केली आहे. स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी या तिघांना संगमनेरच्या घारगांव पोलिसांकडे वर्ग केलं आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं केलेल्या तपासाचं कौतुक पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com