

बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विजयानंतर राजेंद्र राऊत यांनी मोठ्या आत्मविश्वासाने भविष्यातील निवडणुका जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला.
त्यांनी सांगितले की फडणवीस, शिंदे, पवार आणि गोरे यांच्या मदतीने बार्शी तालुक्यातील विकास थांबणार नाही व जनतेचा संभ्रम दूर झाला.
राऊत यांनी स्पष्ट केले की बार्शी नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीतील सर्व जागा आपण जनतेच्या आशीर्वादाने जिंकू आणि तालुक्याचा विकास हा आपलाच प्राधान्यक्रम राहील.
Solapur, 09 December : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही सहकारातील निवडणूक होती, ती अत्यंत कठीण होती. त्याची आम्हाला जाणीव होती. पण मतदार बंधू-भगिनींच्या आशीर्वादाच्या जोरावर आम्ही ती कठीण परीक्षा पास झालो आहोत. जिल्हा परिषदेच्या सहापैकी सहा आणि पंचायत समितीच्या बारापैकी बारा जागा निवडून आणणार आहोत, अशी घोषणा माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी बाजार समितीमधील विजयानंतर केली आहे.
बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील विजयानंतर माध्यमांशी बोलताना राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनी हा निर्धार व्यक्त केला आहे. ते म्हणाले, बार्शी तालुक्यातील जनतेने बाजार समितीच्या निवडणुकीत विजयी करून आशीर्वाद दिले आहेत. वर्षभरापूर्वी एक राजकीय दुर्घटना घडली होती, त्याचं शल्य सगळ्यांच्या मनात होतं. पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मदत केली.
विधानसभेतील पराभवानंतर फडणवीस आणि गोरे यांनी बार्शीत (Barshi) विशेष लक्ष घातलं होतं. बार्शीतील जनतेच्या मनात संभ्रम होता की, तालुक्यातील विकासाच्या गाडीला ब्रेक लागतो की काय? पण मी वेळोवेळी सांगत होतो की, या जनतेने मला तळाहातावरील फोडाप्रमाणे जपलेले आहे. त्यामुळे शेवटच्या श्वासापर्यंत मी बार्शी तालुक्यातील जनतेची सेवा करत राहणार आहे, असेही राऊतांनी नमूद केले.
ते म्हणाले, भौगाेलिकदृष्ट्या बार्शी मतदारसंघ हा कट टू कट आहे, त्यामुळे कधी जय होईल, कधी पराजय होईल. विजय झाला तर हुरळून जाण्याचे कारण नाही आणि पराभव झाला तरी खचून जायचे नाही. तुमच्या सेवेसाठी हा तुमचा जीवाभावाचा मित्र अखंडपणे सेवा करत राहिल, त्यामुळे कोणीही काळजी करू नका.
बार्शी नगरपालिकाही आपण जिंकणार आहेात. तसेच, जिल्हा परिषदेच्या सहापैकी सहा आणि पंचायत समितीच्या बारापैकी बारा जागा आपण तालुक्यातील जनतेच्या आशीर्वादाच्या जोरावर जिंकायच्या आहेत. तालुक्यातील जनतेच्या आशीर्वादाच्या जोरावर आपण आगामी सर्व निवडणुका जिंकणार आहोत. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि पवार आणि पालकमंत्री गोरे यांची भगवंत मैदानावर नागरी सत्काराची जंगी सभा घेऊ, असेही राजेंद्र राऊतांनी स्पष्ट केले.
माजी आमदार राऊत म्हणाले, विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे आपल्या बार्शी तालुक्याचं नुकसान झालं आहे. गेल्या वर्षीचं आणि पुढच्या चार वर्षांचं मागच्या पेक्षा मोठं पॅकेज आपण फडणवीसांकडून घेऊ. आम्हाला कोणतंही घाणेरडं राजकारण करायचं नाही. आमच्या नजरेसमोर फक्त विकासाची भूमिका आहे. शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी, तरुणांच्या हाताला काम आणि बार्शीचं अर्थकारण मजबूत करण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करण्याची माझी तयारी आहे.
→ हा विजय जनतेच्या आशीर्वादाचा परिणाम असून भविष्यातील सर्व निवडणुका जिंकण्याचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.
→ फडणवीस, शिंदे, अजित पवार आणि पालकमंत्री गोरे यांचे योगदान त्यांनी मान्य केले.
→ नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतील सर्व जागा जिंकण्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केला.
→ ते म्हणाले की पराभव-यश काहीही झाले तरी ते अखंडपणे बार्शी तालुक्याची सेवा करत राहतील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.