Girish Mahajan Politics: भाजपच्या संकटमोचकाच्या अडचणी कमी होईनात, प्रतिस्पर्धी उमेदवाराची कोर्टात धाव, काय आहे प्रकरण?

Girish Mahajan legal issues explained: पाचोरा निवडणुकीतील त्या निर्णयाने साधना महाजन यांचा जामनेर नगराध्यक्ष पदावर टांगती तलवार!
Sadhna Mahajan & Girish Mahajan
Sadhna Mahajan & Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

Girish Mahajan News: जामनेर हा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा मतदारसंघ आहे. येथे साधना महाजन बिनविरोध नगराध्यक्ष झाल्या आहेत. मात्र आता ही निवडणूक वादाच्या भवरात सापडली आहे.

जामनेर नगरपालिका निवडणूक भाजपच्या आक्रमक धोरणाने चर्चेत आली आहे. पक्षाचे संकट मोचक गिरीश महाजन यांच्यावर या निमित्ताने आरोप होत आहेत. या आरोपातून महाजन यांची सहजासहजी सुटका होईना.

जामनेर नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदी भाजपच्या साधना गिरीश महाजन बिनविरोध झाल्या. त्यांच्या प्रतिस्पर्धी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ज्योत्सना विसपुते आणि प्रतिभा झाल्टे यांचे उमेदवारी अर्ज बाद करण्यात आले होते. उमेदवारी अर्ज बाद करण्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे.

Sadhna Mahajan & Girish Mahajan
ECI Politics: नाशिकसह पुणे, मुंबईच्या महापालिका निवडणुकीत मतदारयादी कळीचा मुद्दा?, हरकतींचा पडला पाऊस!

नगरपालिका निवडणुकीत सूचकांची संख्या किती याचे नियम अचानक बदलण्यात आले. सूचक एक ऐवजी पाच करण्यात आले. या निकषांमुळे साधना महाजन यांच्या विरोधातील दोन्ही महिला उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले.

Sadhna Mahajan & Girish Mahajan
BJP Candidate Rush: इच्छुकांची भाऊ गर्दी महापालिका निवडणुकीसाठी भाजपची डोकेदुखी, शिवसेना ठाकरे पक्षाला लागणार का लॉटरी!

पाचोरा नगरपालिका निवडणुकीत जामनेरचा निकष लावून भाजपच्या उमेदवार अमरीन देशमुख यांचा अर्ज बाद झाला. भाजप उमेदवाराला जे जामनेर मध्ये फायदेशीर ठरले ते पाचोऱ्यात अंगलट आले. श्रीमती देशमुख यांनी यासंदर्भात न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने देशमुख यांच्या बाजूने निकाल दिला.

पाचोरा येथील उमेदवाराच्या अर्ज बाबत झालेल्या निर्णयाने जामनेर येथील ज्योत्स्ना विसपुते यांनीही न्यायालयात धाव घेतली आहे. पाचोरा नगरपालिकेतील भाजपच्या श्रीमती देशमुख यांच्याबाबत लावण्यात आलेला निकष हा त्यांचा मुद्दा आहे.

त्यानुसार निर्णय झाल्यास श्रीमती साधना महाजन यांची बिनविरोध निवडणूक अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे संकट मोचक गिरीश महाजन यांच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे नाहीत.

जामनेर निवडणुकीत भाजपचे अन्य नऊ नगरसेवक देखील बिनविरोध झाले. त्यांच्या विरोधातील उमेदवारांना दबाव आणि अमिषे दाखवून अर्ज मागे घेण्यात आले. साठी दबाव तंत्र वापरण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते दिलीप खोडपे यांनी केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com