ECI Politics: नाशिकसह पुणे, मुंबईच्या महापालिका निवडणुकीत मतदारयादी कळीचा मुद्दा?, हरकतींचा पडला पाऊस!

Nashik Pune Mumbai voter list objections explained: हरकतींसाठी मुदत वाढवली, मात्र यादी दुरुस्तीला अवघा आठवड्याचा कालावधी वादात सापडण्याची चिन्हे आहेत.
ECI voter list issue Maharashtra
ECI voter list issue MaharashtraSarkarnama
Published on
Updated on

Vote Stealing News: विधानसभा मतदार याद्या महापालिका निवडणुकीसाठी वापरण्यात येत आहेत. त्यात प्रभाग निहाय याद्या करताना जाणीवपूर्वक गोंधळ केल्याचा आरोप आहे. या आरोपावरून राजकीय पक्ष आणि आयोग समोरासमोर आले आहेत.

महापालिका निवडणुकांसाठी मतदार याद्या कळीचा मुद्दा बनला आहे. यावरून शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आक्रमक आहे. उद्धव आणि राज ठाकरे यांनी या विषयावर निवडणूक आयोगाला घेरले आहे. राज्य निवडणूक आयोगाला विरोधी पक्षांच्या वतीने सूचना करण्यात आल्या.

महापालिका निवडणुकांबाबत प्रशासकीय स्तरावर सुरू असलेले काम सत्ताधारी भाजपला अडचणीचे ठरण्याची चिन्हे आहेत. मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर त्रुटी आहेत. त्याचा फटका उमेदवारांना बसणार आहे.

ECI voter list issue Maharashtra
Suraj Chavan: 'खा कोणाच पण मटण, पण दाबा घड्याळ्याचं बटन'; अजितदादांच्या नेत्याचं मतदारांना आवाहन

मतदार यादी आणि बोट चोरी हा प्रश्न गेले काही महिने गाजतो आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी याबाबत निवडणूक आयोगाला उघडे पाडले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी या विषयावर विरोधकांना संघटित केले.

ECI voter list issue Maharashtra
Girish Mahajan : गिरीश महाजनांची किमया; 2 दिवसांपूर्वी रडत माघार घेणारा राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता हसत भाजपमध्ये!

महापालिका निवडणूक प्रक्रिया आणि मतदार यादीवरील हरकती नोंदविल्या जात आहेत. प्रत्येक शहरात हरकतींचा पाऊस पडला आहे. नाशिक शहरात सुमारे चार लाख मतांचा घोळ आहे. धुळे शहरात अडीच हजार हरकती घेण्यात आल्या.

आता प्रशासन या तक्रारीमुळे आणि आक्रमक राजकीय नेत्यांमुळे नरमले आहे. हरकतींची मुदत सात दिवसांपासून वाढवली. आता येत्या तीन डिसेंबर पर्यंत मतदार याद्यांवरील सूचना नोंदविता येतील.

निवडणूक आयोगाने एक पाऊल मागे टाकले आहे. मात्र हरकतींना मुदतवाढ दिली. हरकतींवर प्रत्यक्ष कार्यवाही होणार का? हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मतदार याद्या दुरुस्त करण्याबाबत प्रशासनाकडे अवघा सात दिवसांचा कालावधी आहे. त्यामुळे हा प्रश्न निर्माण होतो.

या संदर्भात निवडणूक आयोगाने काढलेले परिपत्रक कळीचा मुद्दा आहे. त्यात बल्क तक्रारी स्वीकारू नये. आणि पातळीवर दुरुस्ती करू नये अशा सूचना आहेत. मात्र मतदार यादीच्या कंट्रोल चार्ट मध्ये डिलीट ऐवजी प्रभाग अथवा बूथ स्तरावरील नावे वगळणे याला हरकत नाही. त्या दृष्टीने शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष जागरूक राहुन पाठपुरावा करील.

-मसुद जिलानी, सचिव, शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com