BJP Candidate Rush: इच्छुकांची भाऊ गर्दी महापालिका निवडणुकीसाठी भाजपची डोकेदुखी, शिवसेना ठाकरे पक्षाला लागणार का लॉटरी!

BJP municipal election politics: महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडे सर्वाधिक इच्छुक, भाजप, शिवसेना शिंदे पक्षाची स्वबळाची शक्यता वाढली!
Girish Mahajan
Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

BJP ticket distribution dispute: महापालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनी इच्छुकांकडून प्रस्ताव मागविले आहेत. यामध्ये अपेक्षेप्रमाणे महायुती आघाडीवर आहे. सर्वाधीक इच्छूक अपेक्षेप्रमाणे सत्ताधारी भातीय जनता पक्षाकडे आहेत.

महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन त्यावर बारीक लक्ष ठेवून आहेत. पक्षाची यंत्रणा निवडणुकीसाठी रोज काम करीत आहे.

सत्ताधारी पक्ष आणि साधनसामुग्रीची मुबलकता यामुळे सध्या निवडणूक तयारीत भाजप आघाडीवर आहे. त्याचा परिणाम म्हणजे या पक्षाकडे प्रत्येक प्रभागात असंख्य इच्छुक आहेत. इच्छुकांची गर्दी कमी होण्याऐवजी सतत वाढत आहे.

Girish Mahajan
Suraj Chavan: 'खा कोणाच पण मटण, पण दाबा घड्याळ्याचं बटन'; अजितदादांच्या नेत्याचं मतदारांना आवाहन

महायुती महापालिका निवडणुकीत एकत्र राहणार की स्वतंत्र लढणार याचे उत्तर सध्या सुरू असलेल्या नगरपालिका निवडणुकीत मिळाले आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेना शिंदे पक्षाने स्वबळाची तयारी केली आहे. आजच्या घडीला महायुती त्या दृष्टीने पुढे राहण्याची चिन्हे आहेत.

Girish Mahajan
ECI Politics: नाशिकसह पुणे, मुंबईच्या महापालिका निवडणुकीत मतदारयादी कळीचा मुद्दा?, हरकतींचा पडला पाऊस!

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक महापालिका निवडणुकीत हंड्रेड प्लस जागा मिळवणार याची वारंवार घोषणा केली आहे. त्यादृष्टीने विरोधी पक्षातील अनेक प्रबळ उमेदवार त्यांनी भाजप पक्षात आणले. सध्यातरी विरोधकांकडे निष्ठावंत सोडल्यास प्रबळ उमेदवारांची वानवा आहे, हे लपून राहिलेले नाही.

भाजपकडे एका प्रभागात चार ते पाच इच्छुक आहेत. या सगळ्यांची उमेदवारीची अपेक्षा पूर्ण होण्याची शक्यता नाही. निवडणूक पाच वर्षातून एकदा येत असल्याने यातील अनेक उमेदवार ऐनवेळी पक्षांतर करण्याच्या मनस्थितीत आहेत.

भाजप कडील इच्छुकांची भाऊ गर्दी त्यांची कोंडी करण्याची शक्यता आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष त्याकडे डोळे लावून बसला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्ष त्या दृष्टीने फारसे आक्रमक नाहीत. ऐन निवडणुकीत काँग्रेस पक्षाने न लढताच हत्यारे खाली ठेवल्याचे चित्र आहे.

नाशिक महापालिका निवडणुकीसाठी महायुती एकत्र लढण्याची चिन्हे नाहीत. तसे संकेत भाजपने यापूर्वीच दिले आहेत. शिवसेना शिंदे पक्षानेही आपल्या राजकीय अस्तित्वासाठी वेगळा मार्ग निवडला आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावरून सत्ताधारी पक्षातून आउटगोइंग होण्याची चिन्हे आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com