`हिजाब`च्या विरोधासाठी मालेगावात भाजप- जनता दलाने मिसळला सुरात सुर!

मालेगाव शहरातील उर्दू घराला हिजाबचे समर्थन केल्याने चर्चेत आलेल्या मुस्कान खान यांचे नाव देण्यात आले.
Hijab Supporter girl
Hijab Supporter girlSarkarnama

मालेगाव : शहरात अल्पसंख्यांक विभागातर्फे साकारलेल्या उर्दू घराला कर्नाटकातील हिजाब (Hijab) प्रकरणानंतर प्रकाशझोतात आलेल्या बीबी मुस्कान खान (Muskan) या तरुणीचे नाव देण्याचा प्रस्ताव महासभेत वादग्रस्त चर्चा व गोंधळानंतर बहुमताने मंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे या विषयावर राजकारण करणाऱ्या भाजपला (BJP) जनता दलाने (Janata Dal) साथ दिल्याने तो चर्चेचा विषय ठरला.

Hijab Supporter girl
दिवसा राष्ट्रवादीच्या बैठका घेणारे रात्री प्रवेशासाठी भाजप नेत्यांशी संपर्क करतात!

काल झालेल्या महासभेत सत्तारुढ शिवसेनेचे उपमहापौर निलेश आहेर यांनी या प्रस्तावात शिवसेना तटस्थ असल्याचे सांगितले. भाजप गटनेते सुनील गायकवाड, जनता दल गटनेत्या शानेहिंद निहाल अहमद व महागटबंधन आघाडीतील एकमेव सदस्य अतिक कमाल अहमद यांनी मात्र या प्रस्तावाला विरोध केला.

Hijab Supporter girl
कुलसचिव व मुलाची हत्या करून ९६ लाखांचे शेअर विकले

महापौर ताहेरा शेख यांच्या अध्यक्षतेखाली महासभा झाली. उपमहापौर निलेश आहेर, उपायुक्त राजेंद्र खैरनार, नगरसचिव श्‍याम बुरकुल सभास्थानी होते. मुस्कान खानच्या वादग्रस्त प्रस्तावामुळे सभा वादळी ठरण्याची शक्यता असल्याच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षा दलाच्या जवानांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सभेत गानसम्राज्ञी लता मंगेशकर, संगितकार बप्पी लहरी आदींसह शहरातील मान्यवरांना शोकप्रस्तावाद्वारे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सत्तारुढ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या या प्रस्तावाला विरोधी महागटबंधन आघाडीच्या श्री. अहमद वगळता सर्व सदस्यांनी संमती दर्शविल्याने मुस्कान खान नाव देण्याचा प्रस्ताव बहुमताने मंजूर झाला.

नगरसचिव श्‍याम बुरकुल यांनी प्रस्तावांचे वाचन केले. अवघ्या चाळीस मिनिटात महासभेत १४ प्रस्ताव मंजूर करण्यात आले. यात शहराला गार्बेज फ्री सिटी व ओडीएफ दर्जासंदर्भात विचारविनियम, शासकीय जमिनीवरील झोपडपट्टीधारकांना सातबारा उतारा देणे, विकासकामांचे तांत्रिक लेखापरिक्षण शासकीय तंत्र शिक्षण संस्था नाशिक व सपकाळ इंजिनिअरींग कॉलेजकडून करुन घेणे, जंतुनाशकांची निविदा प्रक्रिया राबविणे, जाफरनगरातील ओटे अनामत घेऊन नाममात्र दरात देणे, शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासह राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यावर कायमस्वरुपी सुरक्षारक्षक, सफाई कामगार व सीसीटीव्ही बसविण्यासंदर्भात निर्णय, मनपाचे उद्यान व जिमखाने सेवाभावी संस्थांना देणे, आकस्मिक निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना दहा लाख सानुग्रह अनुदान देणे, नयापुरा भागातील खेळाचे मैदान, उद्यान आरक्षण वगळणे, तसेच पारोळा येथील जिल्हा परिषद शिक्षिका सुलताना सिद्दीकी यांची महापालिका शिक्षण मंडळात आंतरजिल्हा बदली करणे आदी प्रस्ताव मंजूर झाले. जाफरनगरातील ओट्यांच्या प्रस्तावात सोमवार बाजार व्यापारी संकुलातील बाजार ओट्यांची अनामत कमी करुन भाडे तत्वावर देण्याचा प्रस्ताव ऐनवेळी श्री. आहेर यांच्या सूचनेवरुन समाविष्ट करण्यात आला.

उर्दू घराला बीबी मुस्कान खान नाव देण्याचा प्रस्ताव महिलांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी मंजूर करण्यात आला. मुस्कानच्या ऐवजी हिंदु अथवा कोणत्याही धर्माच्या तरुणीने असे धैर्य दाखविले असते तरी आपण तिचा गौरव केला असता.

- ताहेरा शेख, महापौर, मालेगाव

----

कर्नाटकातील हिजाब प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने व राज्यात या प्रकरणावरुन कुठलाही वाद नसल्याने पक्षनेतृत्वाच्या आदेशावरुन शिवसेनेने या प्रस्तावात तटस्थतेची भूमिका घेतली.

- निलेश आहेर, उपमहापौर, मालेगाव

----

कर्नाटकच्या प्रश्‍नावरुन येथे राजकारण करण्याचा प्रश्‍न नाही. धर्माच्या नावाने मुस्कान खानचे उदात्तीकरण करुन शहरात वादग्रस्त प्रस्तावाच्या माध्यमातून जातीय तेढ निर्माण करु नये.

- सुनील गायकवाड, भाजप गटनेते, मालेगाव

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com