Ahmednagar News, 11 May : मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब संदर्भातील वक्तव्यावर काँग्रेसचे नेते विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ( vijay Wadettiwar ) एकटे पडले आहेत. काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाने देखील विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर हात झटकले आहेत. विजय वडेट्टीवार काँग्रेस पक्षाचे आहेत. ते आणि त्यांचा पक्ष यासंदर्भात भूमिका मांडेल', असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या मुद्यावर भाष्य करणे टाळले.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil ) आणि सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार नीलेश लंके ( Nilesh Lanke ) यांच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule ) यांनी नगरमध्ये विजय वडेट्टीवार यांनी अजमल कसाबच्या वक्तव्यावरून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना टार्गेट केले होते. काँग्रेसचे हे वक्तव्य पवार आणि ठाकरे यांना मान्य आहे का? असा सवाल करत चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेरलं होते. यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी 'भटकलेला आत्मा' म्हणतात, तर कधी आम्हाला 'एनडीए'त सहभागी होण्याचे आमंत्रण देतात. याचा अर्थ पंतप्रधानांचा वारू भरकटलाय. टोकाची विधाने करून भूमिका पंतप्रधान मांडत आहे. अंबानी-अदानी आणि राहुल गांधींबाबत विधान पटणारे नाहीत. भाजपला पराभव दिसू लागला आहे. परिस्थिती भाजपच्या हाताबाहेर केली आहे. 'काँग्रेस मुस्लिमांना संपूर्ण आरक्षण देण्याची शक्यता आहे,' असं विधान पंतप्रधानांनी केलं. त्याचं हे विधान पराभव सांगत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा शिवसेना यापैकी कोणाचाही जाहिरनाम्यात त्याचा उल्लेख नाही. आम्ही जातनिहाय जनगणना करणार आहोत, असे जाहिरनाम्यात म्हटले आहे. त्यामुळे पंतप्रधानांचे आरोप बालिश आहेत," असेही जयंत पाटील यांनी म्हटले.
भाजपच्या वन नेशन-वन इलेक्शन धोरणावर जयंत पाटील म्हणाले, "लोकसभा निवडणुका सात टप्प्यात घ्याव्या लागतात. म्हणजे यंत्रणा अपुरी पडते. अशावेळी ग्रामपंचायत ते लोकसभेपर्यंत एकाचवेळी घेणे शक्य होणार आहे का? भाजपला सर्वकाही गुंडाळून ठेवण्याचे धोरण आहे."
( Edited By : Akshay Sabale )
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.