Jayant Patil Politics: जयंत पाटलांच्या भेटीसाठी माजी मंत्री बबन घोलप यांची चार तास प्रतीक्षा!

Shinde group`s leader Baban Gholap meets NCP leader: कुटुंबातील दुफळी माजी आमदार योगेश घोलप यांच्या उमेदवारीत अडसर?
Laxman Mandale, Jayant Patil & Yogesh Gholap
Laxman Mandale, Jayant Patil & Yogesh GholapSarkarnama
Published on
Updated on

Devlali constituency News: महाविकास आघाडीच्या जागा वाटपात देवळाली मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे आहे. या पक्षाकडे इच्छुक उमेदवारांची मोठी यादी आहे. त्यामुळे उमेदवार कोण? याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

सध्या विविध पक्षांचे इच्छुक उमेदवार मुंबईत तळ ठोकून आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांच्या कार्यालयाच्या बाहेर अक्षरशः राजकीय कार्यकर्ते आणि नेत्यांची जत्रा आहे. या जत्रेमध्ये अनेक नेत्यांनाही ताटकळत थांबावे लागत आहे.

देवळाली मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार योगेश घोलप हे देखील इच्छुक उमेदवार आहेत. त्यांनी नुकतीच ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी देखील उमेदवारी बाबत चर्चा केली.

गेली तीस वर्ष या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेल्या घोलप कुटुंबीयांमध्ये सध्या मोठा राजकीय विसंवाद आहे. त्यांच्यातील राजकीय दुफळी अडचणीची ठरत आहे. माजी मंत्री बबन घोलप हे सध्या शिवसेना एकनाथ शिंदे गटात आहेत.

Laxman Mandale, Jayant Patil & Yogesh Gholap
Nirmala Gavit Politics: बाळासाहेब थोरात घेणार निर्मला गावित यांच्या उमेदवारीचा निर्णय, उद्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा.

माजी मंत्री घोलप यांची कन्या तनुजा घोलप भारतीय जनता पक्षात आहेत. मुलगा माजी आमदार योगेश हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आहे. बबन घोलप यांची कन्या माजी महापौर नयना घोलप या राजकारणात सक्रिय नाहीत.

त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी माजी आमदार घोलप यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांशी चर्चा करण्याची सूचना केली होती. त्याचबरोबर घोलप कुटुंबीय एकत्र आहे का? असा प्रश्न देखील केल्याचे कळते.

शिवसेना ठाकरे गटाची बैठक काल रात्री मुंबईत झाली. त्यामध्ये काही इच्छुकांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यात माजी आमदार घोलप यांना निमंत्रण नव्हते. त्याबाबत देखील त्यांनी शिवसेना नेत्यांशी आज संपर्क केल्याचे कळते.

Laxman Mandale, Jayant Patil & Yogesh Gholap
Radhakrishna Vikhe : सुजय विखे विधानसभेला निवडणुकीच्या रिंगणात? मंत्री विखेंचे मोठं विधान

उमेदवारी केव्हाही जाहीर होऊ शकते. याची चाहुल लागल्याने माजी आमदार घोलप सक्रिय झाले आहेत. आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विविध स्थानिक नेत्यांशी संपर्क केला. या पार्श्वभूमीवर घोलप कुटुंबीयांमध्ये देखील चर्चा झाल्याचे कळते.

माजी मंत्री घोलप आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेण्यासाठी पक्षाच्या बेलार्ड इस्टेट येथील कार्यालयात गेले होते. या कार्यालयात प्रचंड गर्दी होती. त्यामुळे श्री पाटील यांच्या भेटीसाठी त्यांना चार तास प्रतीक्षा करावी लागली.

या प्रतीक्षेनंतरही अवघी पाच मिनिटाची भेट झाली. त्यात माजी मंत्री घोलप यांनी प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी त्यांना काय सांगितले हे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे आता घोलप यांना उमेदवारी मिळणार का? याबाबतचे सस्पेन्स कायम आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे अनेक इच्छुक उमेदवार आहेत. यामध्ये प्रामुख्याने लक्ष्मण मंडाले यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. आज सकाळी श्री मंडाले यांचे विविध समर्थक व मतदारसंघातील पदाधिकारी प्रदेशाध्यक्ष पाटील यांना भेटले. दोन दिवसांपूर्वी पुणे येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना देवळाली मतदारसंघातील विविध पदाधिकाऱ्यांनी आणि सरपंचांनी श्री मंडाले यांना उमेदवारी द्यावी अशी विनंती केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com