Nirmala Gavit Politics: बाळासाहेब थोरात घेणार निर्मला गावित यांच्या उमेदवारीचा निर्णय, उद्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा.

Balasaheb Thorat will decide Igatpuri candidate tomorrow-इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील 'राहिलेल्या' काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी पक्षाचे नेते करणार चर्चा.
Nirmala Gavit & Balasaheb Thorat
Nirmala Gavit & Balasaheb ThoratSarkarnama
Published on
Updated on

Congress News: आमदार हिरामण खोसकर हे क्रॉस वोटिंग मुळे संकटात सापडले. त्यांनी आता काँग्रेसला राम राम ठोकला आहे. त्यामुळे इगतपुरी मतदारसंघातील उमेदवारी बाबत मोठा पेच आहे. तो सोडविण्यासाठी पक्षनेत्यांची धावपळ सुरू आहे.

विधानसभा निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत पेच असलेल्या जागांचे वाटप आणि उमेदवार यांचा निर्णय घेण्यासाठी धावपळ आहे. इगतपुरी विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारी बाबत पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात उद्या निर्णय घेण्याची शक्यता आहे.

आमदार खोसकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत काँग्रेसचे काही पदाधिकारी ही अजित पवार गटात दाखल झाले आहेत. त्यामुळे मतदारसंघात असलेल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील निर्णय होणार आहे, असे विश्वासनीय सूत्रांनी सांगितले.

माजी आमदार निर्मला गावित या सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आहेत. इगतपुरी मतदार संघाची जागा महाविकास आघाडीत काँग्रेस पक्षाकडे आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या काही नेत्यांच्या सहमतीनेच माजी आमदार गावित काँग्रेसच्या संपर्कात आहेत.

Nirmala Gavit & Balasaheb Thorat
Sharad Pawar politics: शरद पवारांचा भुजबळांच्या विरुद्ध मोठा डाव; शिवसेनेचा उमेदवार घेणार तुतारी!

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांच्याशी त्यांचा संपर्क झाल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. आमदार खोसकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर या दोन्ही तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची भूमिका वरिष्ठ नेते समजून घेणार आहेत.

या संदर्भात उद्या हे सर्व पदाधिकारी श्री थोरात यांची भेट घेणार आहेत. या भेटीत मतदारसंघातील राजकीय परिस्थितीबाबत आढावा घेतला जाईल. यामध्ये अन्य इच्छुक उमेदवारांच्या क्षमतेची चाचणी देखील केली जाईल. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या शिफारशींचा विचार करूनच पुढील निर्णय होणार असल्याचे कळते.

दरम्यान माजी आमदार निर्मला गावित यांनी इगतपुरी त्रंबकेश्वर मतदारसंघात उमेदवारीसाठी आपले प्रयत्न सुरू ठेवले आहेत. त्यांनी मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून संपर्क दौराही सुरू केला होता. मात्र जागावाटपाचा तिढा सुटत नसल्याने त्यांच्या उमेदवारीचा निर्णय लांबला होता.

Nirmala Gavit & Balasaheb Thorat
Eknath Khadse Politics: मुक्ताईनगर मतदारसंघासाठी भाजप आक्रमक, शिंदे गटाची केली कोंडी!

यापूर्वी दोन वेळा त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्या काँग्रेसचे दिवंगत खासदार माणिकराव गावित यांच्या कन्या आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत माजी आमदार निर्मला गावित आणि आमदार हिरामण खोसकर यांच्यात लढत होण्याची चिन्हे आहेत.

इगतपुरी मतदार संघात काँग्रेस पक्षाकडे 18 इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दोन दिवसांपूर्वी याबाबत माहिती दिली होती. पक्ष अतिशय विचारपूर्वकच उमेदवाराची निवड करील, असे ते म्हणाले होते.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com