Jaykumar Rawal : चार मिनिटांत सफाया, मंत्री जयकुमार रावल यांच्या क्रेडिट कार्डवरून लाख रुपये गायब

Jaykumar Rawal Credit Card Fraud : सायबर भामट्यांनी चक्क राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची फसवणूक केली आहे. रावल यांच्या क्रेडिट कार्डवरून अज्ञात व्यक्तीने व्यवहार केले.
Jaykumar Rawal Credit Card Fraud
Jaykumar Rawal Credit Card FraudSarkarnama
Published on: 
Updated on: 

Maharashtra Cyber Crime : राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची सायबर भामट्यांनी फसवणूक केली आहे. रावल यांच्या क्रेडिट कार्डवरून अज्ञात व्यक्तीने दोन व्यवहार केले. त्यातून १ लाख ८९ हजार ५२४ रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. अवघ्या चार मिनिटांच्या अंतराने हे दोन व्यवहार झाल्याचे बँकेकडून आलेल्या संदेशांवरून उघड झाले आहे.

या प्रकरणी मंत्री रावल यांचे स्वीय सहाय्यक किशोर माळी यांनी मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, किशोर माळी हे २००४ पासून मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे शासकीय स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ते मंत्र्यांच्या निवासस्थानी असताना रावल यांच्या क्रेडिट कार्डवरून संशयास्पद व्यवहार झाल्याचे निदर्शनास आले.

Jaykumar Rawal Credit Card Fraud
Nashik NMC News : भाजपने उशीर केला म्हणून न्यायालयात गेले; आता स्वीकृतवरून काँग्रेसमध्येच रस्सीखेच

मंत्री रावल यांच्या मोबाईलवर सकाळी ९ वाजून २७ मिनिटांच्या सुमारास क्रेडिट कार्डवरून ९,०२८ रुपये २८ पैशांचा, तर सकाळी ९ वाजून ३१ मिनिटांच्या सुमारास १ लाख ८० हजार ४९५ रुपये ७९ पैशांचा व्यवहार झाल्याचे संदेश प्राप्त झाले. हे व्यवहार आपण केले नसल्याचे लक्षात आल्यानंतर क्रेडिट कार्डच्या माहितीचा गैरवापर करून अज्ञात व्यक्तीने परस्पर पैसे वापरल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

या दोन्ही व्यवहारांतून एकूण १,८९,५२४ रुपये सायबर भामट्यांनी लंपास केले आहेत. मंत्री रावल यांच्या संमतीशिवाय हे व्यवहार झाल्याचे लक्षात आल्यानंतर किशोर माळी यांनी सायबर हेल्पलाइन क्रमांक १९३० वर तक्रार केली. त्यानंतर मलबार हिल पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अज्ञात आरोपीने क्रेडिट कार्डची माहिती कशी मिळवली आणि व्यवहार कुठे केले, याचा व तपास पोलीस करत आहेत.

Jaykumar Rawal Credit Card Fraud
Nashik ZP News : शाळा बदलून देण्यासाठी शिक्षकांकडून पैशांची मागणी; ऑडिओ क्लिप व्हायरल होताच सीईओ ओमकार पवारांचा दोन अधिकाऱ्यांना दणका

सायबर भामट्यांकडून आमदार, मंत्री, खासदार टार्गेट

गेल्या काही दिवसांपासून सायबर भामट्यांकडून आमदार तसेच मंत्र्यांना लक्ष केलं जात असल्याचं दिसत आहे. नाशिकमध्येही सायबर भामट्यांनी भाजपच्या आमदार सीमा हिरे यांचे whatsapp हॅक केले होते. त्यांच्या संपर्कातील लोकांकडे पैशांची मागणी केली होती. मात्र, वेळीच त्यांच्या हा प्रकार लक्षात आल्याने फसवणूक टळली. त्याआधी कॉंग्रेसच्या धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार शोभा बच्छाव यांचे whatsapp सायबर भामट्यांनी हॅक केले होते. त्यांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील अनेक व्यक्तींना व्हॉट्सॲपवरून पैसे पाठविण्याची मागणी करणारे मेसेज पाठवण्यात आले होते. त्यामुळे सर्वसामन्य नागरिकांसोबतच आता लोकप्रतिनिधींनी देखील सतर्क राहण्याचे गरज आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com