Nashik Crime : नाशिकमधील माजी जिल्हापरिषद सदस्यासोबत काय घडलं? आठ दिवसांनी नाल्यात सापडली बॉडी...

Kailas Chaudhary : कैलास चौधरी जिल्हापरिषदेचे माजी सदस्य होते. त्यांनी २००७ मध्ये शिवसेनेकडून पळसे गटातून अनुसूचित जमाती या राखीव जागेवर जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती.
Pune Crime News
Pune Crime News Sarkarnama
Published on
Updated on

Nashik News : नाशिकच्या पळसे गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्हा परिषदेचे येथील माजी सदस्य कैलास किसन चौधरी (वय ५०) हे आठ दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांचा शोध सुरु असतानाच कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह गुरुवारी (ता. १८) पळसे गावालगत असलेल्या नैसर्गिक नाल्यात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. चौधरी हे शिवसेनेकडून २००७ मध्ये जिल्हा परिषदेवर निवडून गेले होते.

कैलास चौधरी असं मृत माजी सदस्याचं नाव असून ते ११ डिसेंबरला पहाटे पळसे येथील आपल्या घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेले होते. त्यानंतर ते परत न आल्याने नातेवाइकांनी नाशिक रोड पोलिस ठाण्यात ते बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू होता.

राजवाडा परिसरातील नाल्यात येथील एका स्थानिक महिलेला एक मृतदेह दिसून आला, आणि ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर एकच खळबळ उडाली. महिलेने आरडाओरड केल्यावर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तेथे पाहणी केली असता तो मृतदेह जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कैलास चौधरी यांचाच असल्याचे निष्पन्न झाले. (Nashik News)

Pune Crime News
Jalgaon Municipal Election : गिरीश महाजनांचा उजवा हात झाला निवडणूक प्रभारी, राजूमामा भोळेंचे समर्थक नाराज

मृतदेहाजवळ आढळलेली चप्पल, शर्ट याच्या आधारावर, मृतदेहाची ओळख कैलास चौधरी यांच्या मुलाने आणि गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी पटवून दिली. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण विच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. मात्र या घटनेमुळे पळसे परिसरात शोककळा पसरली असून, नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. नाशिक रोडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Pune Crime News
Nashik BJP : नाशिकमध्ये युती नकोच, 2017 प्रमाणेच स्वतंत्र लढायचंय ; भाजप शहराध्यक्षांनी थेट पक्षश्रेष्ठींना कळवलं..

कैलास चौधरी यांनी २००७ मध्ये शिवसेनेकडून पळसे गटातून अनुसूचित जमाती या राखीव जागेवर जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत ते भरघोस मतांनी विजयी झाले होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. दरम्यान चौधरी यांच्या मृत्यूमागचं नेमकं कारण काय? हा अपघात आहे की घातपात? याचा तपास नाशिकरोड पोलीस करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com