Karjat Nagar Panchayat Chairperson : भाजपच्या छाया शेलार नगराध्यक्षपदाचा पदभार घेताच उपनगराध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव

BJP's Chhaya Shelar elected unopposed Karjat chairperson; 13 councillors move no-confidence against vice chairperson : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या चार नगरसेवकांनी छाया शेलार यांच्या नगराध्यक्षपद उमेदवारीला बिनशर्त पाठिंबा दिल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.
Karjat Nagar Panchayat Chairperson
Karjat Nagar Panchayat ChairpersonSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar Political News : अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या छाया सुनील शेलार यांची बिनविरोध निवड झाली.

माजी नगराध्यक्षा रोहिणी सचिन घुले यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी छाया शेलार यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. पीठासीन अधिकारी नितीन पाटील यांनी त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या (NCP SP) चार नगरसेवकांनी छाया शेलार यांच्या नगराध्यक्षपद उमेदवारीला बिनशर्त पाठिंबा दिल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर त्यांनी तात्काळ नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला.

पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच नगरपंचायतीत आणखी एक महत्त्वाची राजकीय घडामोड घडली. भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेवकांसह एकूण 13 नगरसेवकांनी उपनगराध्यक्ष संतोष मेहेत्रे यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला. या संदर्भातील स्वाक्षरीयुक्त पत्र मुख्याधिकारी अक्षय जायभाये यांच्याकडे सादर करण्यात आले.

Karjat Nagar Panchayat Chairperson
Mangalprabhat Lodha Farming Remark: 'शेतीकडे पाप म्हणून...', मंगलप्रभात लोढा यांच्या विधानावर वाद; मंत्रिमंडळातून हकालपट्टी कधी? किसान सभा राज्यभर आक्रमक

या वेळी ज्येष्ठ नगरसेवक नामदेव राऊत यांनी कर्जतच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या चार नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिल्याचे सांगितले.

Karjat Nagar Panchayat Chairperson
Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरातांसाठी वाढल्या अडचणी? ठाणे जमीन प्रकरणात हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश

नगराध्यक्षा निवडीसाठी आयोजित विशेष सभेत प्रा. राम शिंदे समर्थक नऊ नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे चार नगरसेवक उपस्थित होते. तर माजी नगराध्यक्षा रोहिणी घुले आणि त्यांचे चार समर्थक नगरसेवक बैठकीस अनुपस्थित राहिले.

निवडीची घोषणा झाल्यानंतर उपस्थित नगरसेवकांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला. यावेळी जामखेडच्या नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी, माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत, प्रतिभा भैलुमे, उषा राऊत, गटनेते सतीश पाटील तसेच नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com