KC Padvi News : माजी मंत्री पाडवींचा पाय आणखी खोलात; प्रकरण पोहोचलं पटोले, वडेट्टीवार, चव्हाणांपर्यंत

Fraud Allegations on Former congress Minister KC Padvi : काँग्रेसच्या माजी मंत्र्याने कोणा-कोणाला फसवलं? प्रकरण पोहोचलं महाष्ट्रातील वरिष्ठ नेत्यांपर्यंत...
KC Padvi Case
KC Padvi CaseSarkarnama
Published on
Updated on

KC Padvi Congress Leader Nashik News :

काँग्रेसचे आमदार आणि माजी आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांच्याविरोधात आर्थिक गैरप्रकार केल्याप्रकरणी आणखी एक तक्रार पुढे आली आहे. पाडवी यांचे विशेष कार्यकारी अधिकारी यांनी आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार केली आहे. कामे मंजूर करण्यासाठी 57 लाख रुपये जमा करण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात कामे मिळाली नाहीत. घेतलेले पैसेही दिले जात नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

पाडवी यांच्याविरोधात Congress आमदार हिरामण खोसकर यांनीही पक्ष नेत्यांकडे तक्रार केली आहे. पाडवी यांनी एक कोटी 64 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडेही तक्रार केली होती. या प्रकरणाची पक्षाकडून दखल घेतली की नाही, हे स्पष्ट झालेले नाही. पण आता चाळीसगाव मतदारसंघाचे माजी आमदार मधुकर जाधव यांचे पुत्र विनोद मधुकर जाधव यांच्या पत्नी अर्चना विनोद जाधव यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष Nana Patole, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे लेखीही तक्रार केली आहे.

KC Padvi Case
Nashik Congress : दोन काँग्रेस नेत्यांमध्ये आर्थिक व्यवहारातून जुंपली; भाजपच्या हाती आयते कोलीत..!

अर्चना जाधव यांनी केलेल्या तक्रारीनुसार, पती (विनोद जाधव) राजकीय व सामाजिक काम करत असताना त्यांनी आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या विकासकामांसंबंधित वेळोवेळी सुरेश आंबादास रामटेके (विशेष कार्यकारी अधिकारी), के. सी. पाडवी यांच्या मार्फत 57 लाख रुपये दिले होते. याबाबत रामटेके यांच्या सोबतचे व्हाॅटसअॅप संभाषण, चॅटदेखील आहे. सदरची रक्कम त्यांनी पाडवी यांना दिली आहे. यातील साडेतीन लाख रुपयांची रक्कम रामटेके यांनी परत केली. त्याबाबत माझ्याकडे माझे बँक खाते डिटेल्स असल्याचे पत्रात म्हटले आहे. ( Congress Politics )

विनोद जाधव यांना सर्व घटनेचा प्रचंड मानसिक आघात बसल्याने त्यांना ब्रेन हेमरेज झाला आहे. गत 15 महिन्यांपासून रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यासाठी 70 लाखांहून अधिक खर्च झाला आहे. तरी, पाडवी यांनी घेतलेले पैसे परत करावेत, अन्यथा आत्महत्येशिवाय दुसरा कुठलाही पर्याय माझ्याजवळ राहणार नसल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना पाडवी यांनी नाशिक जिल्ह्यात आदिवासी विकास विभागाच्या निधीतून रस्ते विकासाची कामे करण्यासाठी आमदारांकडून जवळपास एक कोटी 64 लाख रुपये घेतल्याचा आरोप आमदार खोसकर यांनी दोन दिवसांपूर्वीच केला.

खोसकर यांनी पाडवी यांना दिलेली एक कोटी 64 लाख रुपयांची रक्कम मागितली असता, पाडवी यांनी ती रक्कम दिली नाही. अधिक तगादा लावल्यानंतर पाडवी यांनी तीस लाख रुपये अदा केले. त्यानंतर नंदुरबार, पवई येथे चकरा मारल्या. मात्र, त्यानंतरही पाठपुरावा केल्यानंतर रक्कम दिली नाही. यावर खोसकर यांनी प्रदेशाध्यक्ष पटोले व गटनेता बाळासाहेब थोरात यांच्याकडे तक्रार केली. आगामी निवडणुकीच्या काळात हा आर्थिक वाद मोठा मुद्दा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

R

KC Padvi Case
Baban Gholap News : धक्कादायक! घोलपांचे राजकीय भवितव्य पुन्हा टांगणीला... हे आहे कारण...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com